डी. एड. उमेदवारांसाठीचे आरक्षण रद्द 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

सातारा -  राज्यातील प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यमासाठी शिक्षक उपलब्ध होत असल्याने तसेच "पवित्र' या संगणक प्रणालीनुसार शिक्षक भरती होणार आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षक भरतीमध्ये इयत्ता बारावी अर्हता तसेच अध्यापक पदविका (डी. एड.) अर्हता इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठीचे 20 टक्के जागेचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे "पवित्र' या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शाळांतील भरती प्रक्रिया ही एकत्रित स्वरूपाची आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारातील तरतुदीनुसार प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीसाठी विषयनिहाय शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी विज्ञान व गणित हे विषय नसल्याने त्याकरिता इंग्रजी माध्यमातून शिक्षक उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता नाही. अनेक शिक्षक इंग्रजी विषय शिकविण्यास तयार असल्याने डी. एड. (इंग्रजी माध्यम) उमेदवारांना 20 टक्के जागा आरक्षणाची आवश्‍यकता भासणार नसल्यानेच हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: D. Ed. Reservation for candidates canceled