भगवान दादा अन्‌ झिंगाट रिमेकही!

Dahihandi
Dahihandi

कोल्हापूर - चव्वेचाळीस वर्षांपूर्वीचा म्हणजेच १९७४ चा ‘बदला’ हा चित्रपट. या चित्रपटातील ‘चोर मच गया शोर..’ या गाण्यावर शत्रुघ्न सिन्हा यांना पहिल्यांदाच दिलखुलासपणे नाचताना प्रेक्षकांनी पाहिलं. भगवान दादांनीही या गाण्यात वेगळीच रंगत आणली होती. अशा जुन्या गीतांबरोबरच ‘नाचे झिंग झिंग झिंगाट’ या झिंगाटच्या रिमेकपर्यंतच्या गीतांवर डीजे यंदा गोविंदांना चिअर-अप करणार आहेत आणि त्याचवेळी हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या तरुणाईला डोलवणार आहेत. एकूणच दहीहंडीच्या थराराबरोबरच जल्लोषालाही उधाण येणार आहे. दरम्यान, ‘मित्रांनो, थराला या नाही तर धरायला या..आपला समजून गोविंदाला या...’ अशा आवाहनांच्या पोस्ट सोशल मीडियावरून शेअर होऊ लागल्या आहेत. 

दहीहंडी उत्सवात सलामीनंतर गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरतात आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने उत्साहाला उधाण येते. येथून पुढे दहीहंडींचा अचूक वेध घेईपर्यंत गर्दीला खिळवून ठेवण्याचं कसब हे ‘डीजें’च्याच हातात. त्यामुळं प्रत्येक वर्षी त्यांची ‘प्ले लिस्ट’ अपडेट होत असते. अर्थात दहीहंडी उत्सव हा ‘डीजे’ मंडळींसाठीची रंगीत तालीम असते.

कारण दहीहंडीनंतरच त्यांच्याही हंगामाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. ‘हमाल दे धमाल’ मधील ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘खुद्दार’मधील ‘मच गया शोर सारी नगरी रे...’,‘हॅलो ब्रदर’मधील  ‘चांदी के डाल पर...’ ही गाणी आजही जितकी लोकप्रिय आहेत, तितकीच जुन्या चित्रपटातीलही. ‘ब्लफमास्टर’ या कृष्णधवल चित्रपटातलं ‘गोविंदा आला रे आला’, ‘रास्ते प्यार के’ मधील ‘गोकुल की गलीयों का काला’, ‘नाच गोविंदा नाच’ मधील ‘आला गोविंदा’ असो किंवा अगदी ‘काला बाजार’ मधील  ‘आला रे आला गोविंदा’ या गाण्यांना आजही तितकीच मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com