esakal | दूध उत्पादकांना हवाई प्रवास: बोनस देण्याची परंपरा खंडित करीत रिबेट ऐवजी लाभांश
sakal

बोलून बातमी शोधा

Dairy declares dividend instead of rebate per liter of milk

दूध उत्पादकांना या पूर्वी हैदराबाद, पुणे, चेन्नई, केरळ, कन्याकुमारिया ठिकाणी संस्थेने हवाई प्रवास घडवून आणला होता.

दूध उत्पादकांना हवाई प्रवास: बोनस देण्याची परंपरा खंडित करीत रिबेट ऐवजी लाभांश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवेखेड : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील संत गाडगेबाबा  दूधसंस्थेने दुधाला प्रतिलिटर रिबेट ऐवजी लाभांश जाहीर केला आहे.


संस्थांची बोनस देण्याची परंपरा खंडित करीत या संस्थेने वेगळा मार्ग चोखाळला आहे. दिवाळीच्या दरम्यान सर्वच दूधसंस्थांची रिबेट देण्यासाठी चढाओढ असते. यामध्ये दूधसंघाकडून मिळणारा लाभांश अधिक संस्थेकडून काही रक्कम घालून उत्पादकांना प्रतिलिटर बोनस देण्याची परंपरा आहे. या मध्ये ज्या दूधउत्पादकाच्या दुधाला चांगली फॅट व एस एन एफ आहे त्यांना मात्र या प्रचलित परंपरेचा तोटा होतो. त्याच्या कष्टाला न्याय मिळत नाही. हे ओळखून गाडगेबाबा दूध संस्थेने वर्षभरात मिळालेल्या एकूण रकमेवर १० टक्के, तर गाय दुधाला पाचटक्के लाभांश दिला. साडेचार लाख रुपयांचे  वाटप झाले. त्याचबरोबर प्रत्येक उत्पादकाला अर्धा लिटर तुपाचे वाटप केले.

हेही वाचा- इस्लामपुरात ‘रयत क्रांती’ विकास आघाडी बनवून लढेल

आशा पद्धतीने लाभांश देणारी वाळवा तालुक्‍यातील ही एकमेव संस्था आहे. जास्तीत जास्त दूध पुरवठा उत्पादकांना रोख रक्कमदेऊन गौरविण्यात आले. गाय, सुरेश येवले(३०००), पोपट घारे(२५००) धनाजी घारे(२०००) स्वाती पाटील (१५००), स्वाती पाटील (१०००)म्हैस, जयश्री महाजन (३०००), माणिक पाटील(२५००)स्वाती पाटील (२०००), सुशांत महाजन (१५००) आशा पाटील (१०००)यावेळी चार लाख ठेवींचे वाटप यावेळी झाले. यावेळी धनंजय थोरात, सुरेश खडके, लालासो पाटील, माणिक पाटील, बाजीराव पाटील, दिलीप पाटील, विश्‍वनाथ, जयवंत पाटील, कृष्णात मोहिते, विजय सावंत, प्रकाश एटम, राजेंद्र थोरात, संपत वारके, दादा गावडे, संदीप एटम, प्रकाश पाटील उपस्थित होते.

दूध उत्पादकांना हवाई प्रवास 

या संस्थेच्या दूध उत्पादकांना या पूर्वी हैदराबाद, पुणे, चेन्नई, केरळ, कन्याकुमारिया ठिकाणी संस्थेने हवाई प्रवास घडवून आणला होता.

संपादन- अर्चना बनगे