दाजीपूर अभयारण्य उद्यापासून खुले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

राधानगरी - विस्तारित वन्यजीव दाजीपूर अभयारण्य पूर्ववत गुरुवारपासून (१ नोव्हेंबर) पर्यटकांसाठी खुले होणार आहे. यामुळे ऐन दिवाळीत जंगल सफारीतून सुटीचा आनंद घेता येणार आहे.

राधानगरी - विस्तारित वन्यजीव दाजीपूर अभयारण्य पूर्ववत गुरुवारपासून (१ नोव्हेंबर) पर्यटकांसाठी खुले होणार आहे. यामुळे ऐन दिवाळीत जंगल सफारीतून सुटीचा आनंद घेता येणार आहे.

जूनपासून पावसाळ्यामुळे अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश बंदी केली होती. जैवविविधतेने संपन्न अभयारण्य क्षेत्रात हंगामात सुमारे १० हजारहून अधिक पर्यटक येतात. निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत दाजीपुरातील अत्याधुनिक पद्धतीचे तंबू निवास, कोकण दर्शन पॉईंट, वाघाचे पाणी या स्थळांची सुधारणा आणि नव्याने उभारणी केलेले निरीक्षण मनोरे आदींमुळे यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. येथून ३० किलोमीटरवर अभयारण्याचे प्रवेश फाटक आहे. तेथून सावराई सडा या शेवटच्या पॉईंटपर्यंत २१ किलोमीटरचा जंगल प्रवास आहे. यासाठी प्राथमिक अवस्थेतील रस्त्यावरून जाण्यायोग्य वाहन घेऊन जावे लागते. 

नवे आकर्षण
अभयारण्य क्षेत्रात हत्तीमहाल येथे उभारण्यात आलेले फुलपाखरू संवर्धन आणि उद्यान अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या ओलवण धरणात पर्यटकांसाठी पुन्हा प्रस्तावित केलेली नौकायन सुविधा यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटकांसाठी नवे आकर्षण असणार आहे.

Web Title: Dajipur Sanctuary open from tomorrow