
जंगलात फिरताना नजरेस सहज दिसणारे, चर्चेत असणारेच प्राणी पाहिले पाहिजेत, असे नाही. काही सूक्ष्म निरीक्षण महत्त्वाचे असते. त्यासाठी फार घनदाट जंगलात जाण्याची आवश्यकता नसते. आपल्या दंडोबाच्या डोंगरावर गेलात तरी तिथे तुम्हाला अनेक जातींचे कोळी पाहायला मिळतील. त्यांचे निरीक्षण करा. त्यातील विविध प्रकार समजून घेण्यासारखे आहेत. जगभरात कोळ्यांच्या ६० हजारांहून अधिक प्रजाती आहेत.
-प्रकाश जोशी, प्राणी मदत व पुनर्वसन संघटना, सांगली