शिष्यवृत्तीत सांगली  जिल्ह्यातील 17 विद्यार्थ्यांचा डंका;  राज्यस्तरीय यादीत मिळवले स्थान  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zp sangli

गेल्या शैक्षणिक वर्षात झालेल्या पाचवीच्या पूर्व उच्च माध्यमिक आणि आठवीच्या माध्यमिक राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यातील अनुक्रमे 105 आणि 110 विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील 17 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले. ही यादी ग्रामीण आहे. 

शिष्यवृत्तीत सांगली  जिल्ह्यातील 17 विद्यार्थ्यांचा डंका;  राज्यस्तरीय यादीत मिळवले स्थान 

सांगली ः गेल्या शैक्षणिक वर्षात झालेल्या पाचवीच्या पूर्व उच्च माध्यमिक आणि आठवीच्या माध्यमिक राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यातील अनुक्रमे 105 आणि 110 विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील 17 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले. ही यादी ग्रामीण आहे. 


पाचवीच्या परीक्षेत राज्यात पाचवा आलेला चिंचणी जिल्हा परिषद शाळेचा किरण रवींद्र माळी जिल्ह्यात प्रथम आला. त्याला 94.44 गुण मिळाले. 


तावदरवाडी जिल्हा परिषद शाळेची विभावरी आनंदा उथळे, नचिकेत गुरुकुल प्राथमिक शाळेची वेदिका सत्यजित यादव, श्री सरस्वती विद्यामंदिर (शेडगेवाडी)ची सृष्टी हरिभाऊ खोडे, बोरगाव जिल्हा परिषद शाळेत अरुण शरद कदम हा राज्यात सातवा आला. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शिंदेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची प्रतीक्षा अशोक कलढोणे राज्यात नववी आली. लिंगनूर (ता. मिरज) येथील सेवाश्रम विद्यालयातील वेदांत सुनील मगदूम राज्यात दहावा आला. 


आठवीतील 110 शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. नचिकेत गुरुकुल शाळेची समृद्धी कृष्णा सावंत राज्यात तिसरी आली. आटपाडी येथील श्री.व्ही. आर. लोणारी गुरुकुल निवासी माध्यमिक विद्यालयातील अथर्व अंकुश जाधव अकरावा आला. चिकुर्डे येथील आनंद गुरुकुलची आदिती विजय पाटील राज्यात बारावी आली. कडेगाव येथील एम. जी. विद्यालयातील साई प्रदीप महाडिक 14 वा आला. समाधान माध्यमिक विद्यालयाची सिद्धी पोपट पाटील पंधरावी आली. कडेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलची सुमेधा शंकर इंगळे पंधरावी आली.

loading image
go to top