महावितरणच्या दिव्याखाली 125 कोटींच्या थकबाकीचा अंधार......सांगलीतील स्थिती

Darkness of Rs 125 crore arrears under MSEDCL
Darkness of Rs 125 crore arrears under MSEDCL

सांगली : लॉकडाउन काळात जिल्ह्यातील वीजबिल वसुली ठप्प आहे. ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यास अवघ्या 11 टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या पावणे नऊ लाख ग्राहकांकडे 125 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे त्याचा झटका महावितरणला बसला आहे. आता वसुलीसाठी ग्राहकांना कॉल केले जात आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात 23 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. त्या दिवसापासून महावितरणने वीज मीटर रिडिंग घेणे बंद केले. वीजबिल छपाई, वितरण आणि बिल भरणा केंद्रे देखील बंद झाले. ग्राहकांना बिल भरण्यासाठी पोर्टल आणि मोबाईल ऍपची सुविधा दिली. ग्राहकांना स्वतः मीटर रीडिंग अपलोड करण्याविषयी आवाहन केले. रीडिंग पाठवणाऱ्या ग्राहकांना ऑनलाईन बिले व मोबाईल संदेश पाठवले गेले. इतरांना सरासरी बिले पाठवली गेली. 
वीज बिलासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असली तरी ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद नाही. अवघ्या 11 टक्के ग्राहकांनी सुविधेचा लाभ घेतला. तीन महिन्यांचे वीजबिल माफ होणार असल्याची अफवा पसरली. बिल माफ करावे म्हणून काहींनी मागणी केली. त्याचा परिणाम थकबाकी वाढण्यात झाला. जिल्ह्यात कृषी, घरगुती, वाणिज्य, लघुदाब व उच्चदाब औद्योगिक आणि इतर ग्राहकांची संख्या पावणे नऊ लाख आहे. ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या 11 टक्के ग्राहकांना वगळता इतर सर्व ग्राहकांनी 90 दिवस बिले भरलेली नाहीत. त्यामुळे थकबाकी 125 कोटींवर गेली. 

यांच्याकडे 65 कोटींची थकबाकी 
जिल्ह्यात 300 रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेले चार लाख 45 हजार ग्राहक आहेत. त्यांच्याकडील थकबाकी 65 कोटी 80 लाख रुपये आहे. हे सर्व ग्राहक घरगुती, वाणिज्य, लघुदाब औद्योगिक अशा प्रकारातील आहेत.

विभागावार ग्राहक आणि थकबाकी

 इस्लामपूर विभाग-  1 लाख 5 हजार 267 ग्राहक (13 कोटी 59 लाख थकबाकी)           कवठेमहांकाळ - 55 हजार ग्राहक (6 कोटी 68 लाख थकबाकी)                         सांगली ग्रामीण- 86 हजार 514 ग्राहक (10 कोटी 8 लाख थकबाकी)                  सांगली शहर- 1 लाख 1 हजार 941 ग्राहक (20 कोटी 30 लाख थकबाकी)            विटा- 96 हजार 239 ग्राहक (15 कोटी 14 लाख थकबाकी)

"जिल्ह्यातील ग्राहकांनी बिल माफ होणार असल्याच्या अफवेवर विश्‍वास ठेवू नये. वीज बिले माफ होणार नाहीत. लॉकडाउनमध्ये महावितरणची थकबाकी वाढली आहे. अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्राहकांनी जवळच्या केंद्रात बिले भरावीत. जूनपासून रीडिंग घेतले जात आहे. नवी बिले रीडिंगनुसार येतील. तत्पूर्वी दोन महिन्यांतील देयके भरावीत.'' 
- पराग बापट, अधीक्षक अभियंता (प्रभारी) सांगली 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com