झेडपी अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या अंगणी नांदतो अंधार 

Darkness in ZP officer-officer's house
Darkness in ZP officer-officer's house
Updated on

नगरः वीजबिल थकल्याने महावितरणने जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकारी राहत असलेल्या परिसराचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे हा परिसर अंधारात बुडाला आहे. 

शहरातील लाल टाकी परिसरात जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी व पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यांचे वीजबिले भरण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची आहे. या परिसरातील पथदिव्यांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची आहे.

मात्र, ते मुदतीत न भरल्यामुळे महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे अधिकाऱ्यांसह पदाधिकारी राहत असलेला हा परिसर सोमवारी (ता. 24) अंधारात होता.

वीज बिल न भरल्यानेच...
वीजपुरवठा बंद असल्यामुळे अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला. वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर काल व आज अंधारच होता. अखेर आज रात्री उशिरा या भागाचा वीजपुरवठा सुरळीत झाला. 
दरम्यान, वीजपुरवठा खंडित, त्यात वीजपंप नादुरुस्त झाल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी मोठी धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांना आहे त्या पाण्यावर दोन दिवस काढण्याची वेळ आल्याने सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. 

घरात उजेड, अंगणात अंधार 
जिल्हा परिषद अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या घरात उजेड व अंगणात अंधार पसरण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे दोन दिवस सर्वांनाच घरात बसण्याची वेळ आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com