ट्रक्टर ट्रॉली व दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

संदिप कदम
गुरुवार, 26 एप्रिल 2018

फलटण (सातारा) : गिरवी नाका चौक येथे सकाळी साडे आठच्या सुमारास गिरवी रोड लगत ट्रक्टर ट्रॉली व दुचाकी धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर  जखमी झाले. तर अपघातानंतर ट्रक्टरचालक फरार झाला.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी वरून चाललेल्या बबन दादा बागल ( वय - ४०)  व शिवांजली बबन बागल (वय १६, दोघे रा. मांडवखडक ,ता.फलटण) हे फलटणच्या दिशेने येत होते. यावेळी ते गिरवी रोड व विंचुर्णी फाटा लगत असलेल्या हाडको कॉलनीतील रोड कडे वळण घेत होते.

दरम्यान  गिरवी नाक्याकडून आलेल्या सुहास पालवे (रा. सदाशिवनगर, ता.माळशिरस ) यांचे मालकीचा मळी वाहतुक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक (एम एच २३ बी ४८०१) ने दुचाकीस समोरुन धडक दिली व ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यालगत असलेल्या ट्रॅक्टर शोरूमचे गेट तोडून आत गेली. यावेळी सदर ट्रॅक्टर ट्रॉलीचा चालक घटनास्थळावरून ट्रॅक्टर ट्रॉली सोडून फरारी झाला.

दरम्यान अपघात जखमी झालेल्या दुचाकीस्वरांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळाची पाहणी करुन पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

Web Title: dash between trolley and two wheeler 2 injured