
दत्तात्रय यांच्या मिनी जिप्सीतून 'कृषीराज्यमंत्री' यांनी मारला फेरफटका
सांगली : देवराष्ट्रे यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या जन्मभूमितील मिनी जिप्सी तयार करून सध्या देशभरात चर्चेत असणारे दत्तात्रय लोहार (Dattatraya Lohar) यांची आज कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम (Viswajit Kadam) यांनी भेट घेऊन त्यांनी बनवलेल्या मिनी जिप्सीतुन फेरफटका मारला. यावेळी राज्यमंत्री कदम यांनी लोहार कुटुंबियांचे कोतुक केले.
हेही वाचा: ‘लस मिळाली, चिंता मिटली’ असेच काहीसे समाधान या मुलांच्या चेहऱ्यावर
यावेळी राज्यमंत्री कदम म्हणाले कि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण, भारती विद्यापीठ, राजकारणततुन शिक्षणाची गंगा देशभर साकारणारे स्व. डॉ. पतंगरावजी कदम यांची ओळख देशभरात आहे. तसेच दत्तात्रय लोहार यांच्यासारख्या हिऱ्याने आपल्या कारागिरीतून सोनहीरा खोऱ्याचे नाव देशभरात केले आहे. याचा अभिमान वाटत आहे.
तसेच दत्तात्रय यांनी बनवलेल्या मिनी जिप्सीची दखल आनंद महिंद्रा यांनी घेतली व त्यांनी बोलेरो गाडी देणार असल्याचे सांगितले आहे. याबद्दल त्यांचे आभार मानतो. स्व. मंत्री पतंगराव कदम यांच्या जयंती दिनी त्यांना. मदतीचा धनादेश देणार असल्याचे राज्यमंत्री कदम म्हणाले.
हेही वाचा: मतदारांसाठी इच्छुकांकडून पायघड्या, मंडप टाकून दिली जातेयं सेवा
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम.
दत्तात्रय लोहार यांच्या मिनी जिप्सीतून फेरफटका मारला व त्यांच्या मुलास वैदिक गणित हे पुस्तक दिले. त्यांनी बनवलेली जिप्सी अदभूत आहे. स्व. मंत्री पतंगराव कदम यांच्या जयंती दिनी त्यांना मदतीचा धनादेश सुपूर्त करणार आहे.
Web Title: Dattatraya Mini Gypsy Minister State For Agriculture Vishwajit Kadam Took A Tour
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..