मतदारांसाठी इच्छुकांकडून पायघड्या, मंडप टाकून दिली जातेयं सेवा

निवडणूकीचे रणशिंग फुंकल्याचेच चित्र सर्वत्र पाहवयास मिळत आहे.
pune Municipality Election
pune Municipality Electionesakal

हडपसर : आगामी महानगरपालिका निवडणुका (Municipal elections) डोळ्यासमोर ठेऊन प्रमुख राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी कोरोना लसीकरण(Corona vaccination), मतदार नोंदणी, रोजगार प्रशिक्षण शिबिरे व देवदर्शन सहली आयोजित करण्याची जणू स्पर्धाच सुरू केली आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने यानिमित्ताने मतदारांना आकृष्ट करीत निवडणूकीचे रणशिंग फुंकल्याचेच चित्र सर्वत्र पाहवयास मिळत आहे.

pune Municipality Election
चिमुकले झाले 'लसवंत'! पुण्यात आठ केंद्रावर दिली कोरोना लस

हडपसर मतदार संघात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसे या पक्षातील आजी माजी नगरसेवकांसह मागील निवडणूकांध्ये पराभूत झालेल्या तसेच नव्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या भागात अशा शिबिरांचा धडाकाच लावलेला आहे. काँग्रेस पक्षातील पराभूतांसह नव्याने इच्छुक असलेले उमेदवारही यात मागे नाहीत. तीन वर्षापूर्वी व नुकतेच नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील इच्छुकांमध्ये वैयक्तीक खर्चाने सामाजिक उपक्रम राबविण्याबात तर मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सरकार, त्यातील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे दोन खासदार, दोन आमदारांच्या रूपाने निर्माण झालेले वर्चस्व यामुळे या भागातील कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली आहे. भाजपचे सारे इच्छूकही पालिकेतील सत्तेचा वापर करून नेत्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपापल्या भागात आणत आहेत. त्यातून मतदारांसमोर आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

pune Municipality Election
PUNE : सीएसआयआर नेटची तारीख बदलली

अनेक इच्छुक स्वतःचा किंवा आपल्या नेत्याच्या वाढदिवसाचा योगायोग जुळवून खेळ पैठणीचा, कुपन गिफ्ट, विविध स्पर्धा असे उपक्रम राबवीत आहेत. घरात एखादे शुभकार्य असल्यासारखे मंडप टाकून येणाऱ्या नागरिकांची सरकारी, खासगी कामे करून दिली जात आहेत. त्यासाठी खास काही तरूण-तरूणींची नेमणूक केली आहे. काही इच्छुकांकडून मोफत रेशन, कपडे तर काहींकडून बालाजी, केदारनाथ, कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर अशा मोफत देवदर्शन सहलींचे आयोजन होत आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना त्या-त्या भागातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस पुरविले आहेत. या मदतीमुळे इच्छुकांच्या कामालाही बुस्टर मिळाला आहे. हीच बाब भाजपा इच्छुकांबाबतही झाली आहे. लसीकरणासह विविध योजनांचे फॉर्म भरून देण्यावर त्यांनी भर दिला आहे.

pune Municipality Election
‘लस मिळाली, चिंता मिटली’ असेच काहीसे समाधान या मुलांच्या चेहऱ्यावर

"सध्या विद्यमानांसह इच्छुकांनी आपापली संपर्क कार्यालये सुरू केलेली दिसतात. या कार्यालयातून मतदार नोंदणीसह विविध प्रकारची सेवा नागरिकांना मिळत आहे. मात्र, त्याच वेळी प्रभागातील समस्यांकडे या मंडळींकडून मोठ्याप्रमाणात दुर्लक्ष होत आहे. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी ही याचा फायदा उचलत आहेत. पाणी, कचरा, रस्ते याबाबत सर्वच प्रभाग दयनीय अवस्थेत आहेत. इच्छुकांच्या कमानी, बँनर, झेंडे व मंडपांनी प्रभाग विद्रूप करून ठेवले आहेत,' अशी भावना काही सुजाण मतदारांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com