प्रेमप्रकरणाला विरोध म्हणून आई वडिलांनीच केला मुलीचा खून

प्रेमप्रकरणाला विरोध म्हणून आई वडिलांनीच केला मुलीचा खून

मंगळवेढा - शेतात कामावर ठेवलेल्या सलगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे जन्मदात्या आई वडीलांनीच मुलीचा खून करून अंतविधी उरकल्याची घटना घडली घडली. याबाबत बाळासाहेब म्हमाणे (रा बोराळे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आई वडीलाविरूध्द भारतीय दंडविधान कलम 302, 201, 34 कलमानुसार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराणे परिसरात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनुराधा बिराजदार ही वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटक सिंदगी येथे होती. तिथेच तिने शेतातील सलगड्याच्या मुलाबरोबर प्रेमविवाह केला. ही बाब वडील विठ्ठल धोंडाप्पा बिराजदार व आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांना रूचली नाही. त्यानी आपल्या मुलिला सिंदगी येथून आणून बोराळे ता. मंगळवेढा येथे दोन दिवसापुर्वी सोडले. या प्रकाराने आपली बदनामी झाली अशी सल मनात होती. म्हणून बोराळे येथून सलगर बुद्रुक येथे तिला आणले आणि तिचा खून करून प्रेत जाळून अंतविधी उरकले. याची फिर्याद दाखल झाली असून, याबाबत आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास सोपान वैभव मारकड करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com