महाविद्यालयातून पहिल्या येणाऱ्या रिक्षाचालकाच्या कन्येला व्हायचे आहे पोलिस अधिकारी

The daughter of rickshaw driver wants to be a police officer
The daughter of rickshaw driver wants to be a police officer

सोलापूर : शिक्षण घेत असतानाच कौटुंबिक जबाबदारी सांभाळत येथील सुप्रिया सिद्धेश्वर भगत ही शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालयात पहिली आली. सुप्रियाचे वडील रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. प्रतिकूल परिस्थिीत सुप्रियाने मिळवलेल्या या यशामुळे पालकांना अत्यानंद झाला आहे. पोलिस अधिकारी होऊन देशसेवा करण्यासह आई-वडीलांचे
स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे सुप्रियाने 'सकाळ'ला सांगितले.

वडील रिक्षाचालक असल्याने आपल्या शिक्षणाच्या खर्चाचा जास्त भार त्यांच्यावर पडणार नाही, याची दक्षता सुप्रियाने घेतली. ही भावना लक्षात ठेवून वडील सिद्धेश्वर यांनीही सुप्रियाच्या अभ्यासात कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची दक्षता घेतली. आवश्यक त्यावेळी पुस्तके उपलब्ध करून दिली. आपण काहीतरी मोठे झाले पाहिजे ही आई-वडिलांचे 
स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे याची जाणीव ठेवून सुप्रियानेही नियोजनपूर्वक अभ्यास केला आणि ती यशस्वी झाली. 

सुप्रियाची शिकण्याची आणि काही तरी करून दाखविण्याची जिद्द पाहून महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही तिला मदत केली, मार्गदर्शन केले. आई-वडीलांचे पाठबळ आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे सुप्रियानेही जिद्दीने अभ्यास केला आणि कला शाखेत 61.84 टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे, सचिव प्राचार्य डाॅ. अनिल बारबोले, ज्ञानेश्वर सपाटे, चिंतामणी सपाटे, प्राचार्या तानाजी माने यांनी तिचे अभिनंदन केले. 

नियोजनपूर्वक अभ्यासाला कष्टाची जोड दिली तर यश आपसूकच मिळते. त्यामुळे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. देशाला अभिमान वाटेल असे कर्तृत्व गाजविण्याचा माझा संकल्प आहे.
- सुप्रिया भगत, विद्यार्थिनी

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com