भल्या पहाटेच "त्याच्या'वर तलवारीचे वार 

At dawn, "the sword struck at him
At dawn, "the sword struck at him

पारनेर : शहरात आंबेडकर चौकात चहाची टपरी चालविणाऱ्या बंडू मते यांच्यावर पूर्व वैमनस्यातून आज (ता. 15 ) सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास दोन ते तीन जणांनी तलावरीने प्राणघातक हल्ला केला. यात मते हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मते यांनी कालच (ता. 14 ) रोजी आंबेडकर चौकात नवीन चहाची टपरी सुरू केली होती. आज मते हे चहाची टपरी उघडण्यासाठी आले असता शहरातीलच रहिवाशी असलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांच्यावर सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास अचानक तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात तलवारीचा वार चुकविताना मते त्यांच्या उजव्या हाताच्या पंजाला गंभीर जखम झाली. तसेच त्याच्या दुसऱ्या हाताला, डोक्‍याला व पायालाही गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी फौजफाट्यासह त्वरीत हजर झाले. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेले आहे. या घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली आहेत. हा हल्ला नेमका कशासाठी झाला व कोणी केला, याचा तपासाची माहिती पोलिसांना मिळाल्याचे समजते. मते यांचे शहरातीलच एका कुटुंबाबरोबर वाद आहेत. त्यातून ही हाणामारी झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळे मते यांच्यावरील हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात समजले. संशयावरूनच पोलिसांनी एका संशयितास ताब्यातही घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. तसेच इतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहे. त्यासाठी काही पथके तयार करून ते जिल्ह्यातील काही भागात तपासासाठी पाठविण्यात आलेली आहेत. 

पारनेर शहरात दहशतीचे वातावरण 
पारनेर शहरात मते या तरुणावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. शांत असलेले पारनेर शहर हल्ल्याची घटना घडल्यामुळे दहशती खाली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी शोध घेऊन आरोपींना कडक शासन करावे, अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे काही काळ पारनेरमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊन दुकाने उघडण्यास लवकर व्यवसायिक धजावत नव्हते. 

जखमी मते यांच्यावर उपचार सुरू 
जखमी मते यांच्यावर नगरमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मते यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक मित्र परिवारासह जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com