डीसीआयबीचा कारागृहावर छापा ; कैदी-अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ

 DCIB raids in belgaum jail
DCIB raids in belgaum jail
Updated on

बेळगाव - हिडलग्यातील मध्यवर्ती कारागृहावर जिल्हा गुन्हे तपासणी दलातर्फे (डीसीआयबी) आज (ता.9) छापा घालण्यात आला. अचानक छापा घातल्यामुळे कैदी आणि अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. 

दरम्यान, छाप्यात मोबाईल आणि  वस्तू जप्त करण्यात आल्याचे समजते. 

रामदूर्गचे डीवायएसपी एस. ए. पाटील आणि पोलिस निरीक्षक लिंगनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवारी सकाळी छापा घातला. गोकाक तालुक्‍यातील खून प्रकरणांमध्ये टायगर गॅंगच्या संशयितांना अटक करण्यात आली आहे. पण, त्यानंतरही कारागृहातून संशयित आरोपी बाहेर साथीदारांशी संपर्क ठेवून आहेत. उद्योजक आणि व्यापाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी, भिती घालत असल्याची प्राथमिक आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पथकाने छापा घातल्याचे सुत्रांनी सांगितले. 

सामुहिक गुन्हे, उद्योजकांना धमकाविणे आणि जिवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी गंभीर गुन्ह्यात टायगर गॅंगचा सहभाग आहे. त्यामुळे गॅंगमधील नऊ जणांविरुध्द कोका कायद्याखाली गुन्हा नोंदविला आहे. पण, त्यानंतही संशयितांच्या कारवाया सुरु असल्याचे जाणविले. यावेळी मोबाईल जप्त केल्याचे समजते.

पुढील चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. कोरोनासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर गुन्हे व अपघातात घटले होते. पण, अनलॉकनंतर  गोकाक येथे अलिकडे खुनाची घटना घडली. त्यासाठी पाळेमुळे खणून काढण्यात आली. संशयित आरोपींना अटक करून हिंडलगा कारागृहात त्यांची रवानगी केली. पण, तेथून बाहेरच्या जगताशी ते संपर्क ठेवत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Krishna River pollution after Ganesh Visarjan
Miraj Government Hospital RCC slab collapse
Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Marathi News Esakal
www.esakal.com