खरीप हंगाम पिक विम्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

सांगली-  प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या पिकांसाठी महसूल मंडळ, मंडळ गटस्तरावर तसेच, मका व तूर पिकांसाठी तालुका गटस्तरावर विमा क्षेत्र घटक धरुन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी भाग घेण्याची अंतीम मुदत 31 जुलै 2020 आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पिकनिहाय प्रति हेक्‍टर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता व कंसात विमा संरक्षित रक्कम असी- भात 600 (30 हजार रूपये), खरीप ज्वारी 500 (25 हजार रूपये), बाजरी 440 (22 हजार रूपये), भुईमूग 600 (30 हजार रूपये), सोयाबीन 800 (40 हजार रूपये), मूग 360 (18 हजार रूपये), तूर 500 (25 हजार रूपये), उडीद 360 (18 हजार रूपये), मका 600 (30 हजार रूपये). 

योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in या वेब पोर्टलवरून ऑन लाईन अर्ज भरु शकतील. अर्जदाराने आपल्या सोबत आधार कार्ड /आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असेल तर करारनामा, सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र आणि बॅंक पासबुकची झेरॉक्‍स,मोबाईल क्रमांक इत्यादी अर्जास जोडणे, ऑनलाईन पध्दतीने जोडण्यासाठी आवश्‍यक आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The deadline for kharif season crop insurance is July 31