
Sangli Police : ‘सांगलीतील महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे याने शासकीय नोकरी मिळवताना कर्णबधिर दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे. दिव्यांग कोट्यातून नोकरीसाठी त्याने सादर केलेल्या या प्रमाणपत्राची चौकशी करावी,’ अशी मागणी २ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती इस्लामपूर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी दिली. मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, ईडी आणि दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांनाही निवेदनाच्या प्रती दिल्याचे त्यांनी सांगितले.