
बिजवडी (जि. सातारा) : येथील श्रीमती ताराबाई रघुनाथ भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी येताना दुचाकीला पाठीमागून दुसऱ्या दुचाकीने ठोकरल्याने सुनेचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या मुलासह दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. सविता तात्याबा भोसले (वय 42) असे मृताचे नाव आहे. सासूबाईंच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या सूनबाईंवर काळाने घाला घातल्याने बिजवडी व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
येथील ताराबाई भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा मुंबईतील मुलगा विजय हा गावी येण्यासाठी निघाला होता, तर बारामतीला कामानिमित्त असलेला दुसरा मुलगा तात्याबा हे पत्नी सविता, मुले अजय व प्रसाद यांना घेऊन दोन दुचाकींवरून गावी येत होते. एका गाडीवर सविता व अजय होते, तर दुसऱ्या गाडीवर तात्याबा व प्रसाद होते. दोन्ही गाड्या बरोबरच येत होत्या. काल (ता. 9) रात्री साडेआठच्या सुमारास दहिवडी-फलटण रस्त्यावर बिजवडीनजीक शिंदे वस्तीवर सविता व अजय (वय 22) यांची गाडी आली असताना पाठीमागून येणाऱ्या वैभव इंगळे (वय 22, रा. अनभुलेवाडी, ता. माण) या दुचाकीस्वारीने भरधाव वेगात धडक दिली.
त्यात सविता, अजय व वैभव हे रस्त्यावर पडले. सविता यांच्या डोक्याच्या पाठीमागील भागाला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अजय व वैभव हे जखमी झाले. जखमींना बिजवडीतील दवाखान्यात आणले. सविता यांना दहिवडी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. वैभवला उपचारासाठी फलटणला हलवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. भुजबळ तपास करत आहेत.
हेही वाचा : त्याला वाचविण्यासाठी धुळवडीचा सण बाजूला ठेवून अख्खे गाव जमले तळयाकाठी
सासूसह सुनेला एकाच वेळी अग्नी
सासूच्या निधनाची बातमी समजताच अंत्यविधीसाठी येत असलेल्या सुनेचा अपघाती मृत्यू झाल्याने त्या कुटुंबावर मोठा आघात झाला. दोघींना एकाच वेळी अग्नी देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे बिजवडी व परिसरातील नागरिक शोकाकूल झाले आहेत. तात्याबा भोसले हे रोजंदारी करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत होते. आपल्या पत्नीसह दोन्ही मुलांना घेऊन ते काही दिवसांपूर्वीच बारामती येथे खासगी कंपनीत कामासाठी स्थायिक झाले होते. चौघेही कामाला असल्याने चांगले दिवस सुरू झाले होते. अनेक वर्षांनंतर या कुटुंबाची व्यवस्थित घडी बसत असताना काळाने त्यांच्या पत्नींवर घाला घातला.
वाचा : CoronaVirus : जग कसे बदलेल सांगणारा टिकटाॅक व्हिडिओ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.