विजेच्या धक्‍क्‍याने शेतकऱ्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

श्रीरामपूर : नांदूर (ता. राहाता) येथील शेतकरी एकनाथ मारुती अभंग यांचा शेतातील वीजपंप सुरू करताना विजेच्या धक्‍क्‍याने आज मृत्यू झाला. वीजपंपाच्या पॅनल बोर्डात वीज उतरल्याने ही दुर्घटना झाली.

दोन दिवसांच्या वादळानंतर वीजपुरवठा नुकताच सुरू झाल्याने, अभंग नेहमीप्रमाणे आज सकाळी घराजवळील विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेले होते. मात्र, ते परत न आल्याने कुटुंबीयांनी विहिरीकडे जाऊन पाहिले असता ते पॅनल बोर्डाला चिकटल्याचे दिसले. नातेवाइकांनी आरडाओरडा केल्याने आसपासचे रहिवासी तेथे आले. त्यांनी रोहित्रातून वीजपुरवठा बंद केला. 

Web Title: The death of the farmer by electric shocks

टॅग्स