मयत कार्यकर्त्याच्या कुटुंबाचे आ. भालके यांनी स्विकारले पालकत्व

 हुकूम मुलाणी
शनिवार, 23 जून 2018

बहुचर्चित 35 गाव पाणी आंदोलनाच्या संघर्ष समितीतील मुख्य प्रवर्तक लवंगीचे सरपंच जयसिंग निकम यांच्या हदयविकाराने झटक्याने झालेल्या अकाली निधनानंतर कुटूंबाच्या पालकत्वाची जबाबदारी आ. भारत भालके यांनी घेतली आहे. 

मंगळवेढा - बहुचर्चित 35 गाव पाणी आंदोलनाच्या संघर्ष समितीतील मुख्य प्रवर्तक लवंगीचे सरपंच जयसिंग निकम यांच्या हदयविकाराने झटक्याने झालेल्या अकाली निधनानंतर कुटूंबाच्या पालकत्वाची जबाबदारी आ. भारत भालके यांनी घेतली आहे. 

2009 च्या लोकसभा निवडणुकीत तालुक्याच्या दक्षिण भागातून शेतीच्या पाण्यासाठी बहिष्काराच्या आंदोलनाची ठिणगी भाळवणीत पडली असली तरी तिला अधिक तेवत ठेवण्याची काम निकम यांच्या नेतृत्वाखाली झाले. या भागातील पाणीप्रश्नी निकम यांनी अन्य सहकार्‍यांसोबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे अशात
 निकम यांच्या अकाली निधनाने परिवारावर कोसळलेल्या दुखाचे सांत्वन करण्यासाठी आ. भारत भालके लवंगीत होते या वेळी संत दामाजी कारखानाचे माजी संचालक पांडुरंग चौगुले, अशोक जाधव, दिनेश पाटील, याकूब पटेल, मदन घाटगे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

आ. भालके म्हणाले की, स्वतःचा प्रपंच सांभळाला नाही आपले आयुष्य समाजासाठी खर्ची घालत दक्षिण भागातील गोरगरीब कष्टकरी आणि सांमान्य लोकांसाठी कायम झटनारा एक युवा कार्यकर्ता या भागाने गमविला त्याची पोकळी कदापि भरून निघणार नाही अशा व्यक्तीच्या मुलांच्या शिक्षणासहित सर्व पालत्वकाची जबाबदारी स्विकारुंन मी त्याना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. आपल्या छोट्याशा राजकीय कारकीर्दित दोन वेळा लवंगी गावचे सरपंच पद भूषवले. शिवाय तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही चांगले काम केले. लोकांचे प्रश्न सोडवताना घरांतील कामे बाजूला सोडुन कोणताही वाद सोडवून स्वतासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता पाण्याच्या प्रश्नावर माझ्या सोबत नेहमी आग्रही असणारा जिगरबाज लढवय्या आणि स्वाभिमानी कार्यकर्त्याला मी मुकलो असल्याची खंत आ. भालकेनी व्यक्त केली

Web Title: on death of the party worker's their familys responsinbilities took MLA Bhalke