माऊलींच्या तीन भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू

dead_body.jpg
dead_body.jpg

फलटण शहर ( सातारा) :  तरडगाव येथून माऊलींच्या पालखीचा सोहळा फलटणच्या दिशेने  प्रस्थान होत असताना पालखीच्या पुढे असणारऱ्या तीन  भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना  घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कलुबा तुळशीराम सोलने (वय ६५ रा. सिंदखेड राजा जि. बुलडाणा) व सुभाष चंद्रभान गायकवाड (वय ५५ रा. मुकुंदवाडी ता. जि. औरंगाबाद) व अन्य एक अशा तीन भाविकांचा पायी चालत होते. दरम्यान ते फलटण शहर हद्दीत आले असता त्यांना  हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये दोघांचा हदयविराकाच्या झटक्याने जागीच मृत्यू  झाला.

तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने शहरासह वारकरी भाविकांत शोककळा पसरली.  माऊलींच्या पायी वारीत आलेल्या या मृत्यूमुळे अनेक भाविकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, तहसीलदार विजय पाटील, व मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी या दिंडीतील लोकांची भेट घेऊन या घटनेबाबत दुःख व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com