`तिचा` फोन आला आणि लाखोंचा गंडा बसला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

फायनान्स कंपनीत 30 लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला 7 लाख 61 हजारांचा गंडा घातल्या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद रामदास पांडुरंग सुरवसे (वय 35, गोकुळ शिरगाव) यांनी दिली. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः प्रिया शर्मा, काव्या कुलकर्णी, नेहा सावंत, अमोल पोवार, राजीवराणे यांच्या नावे असणाऱ्या मोबाईलवरून बोलणाऱ्या व्यक्ती.

कोल्हापूर  ः फायनान्स कंपनीत 30 लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला 7 लाख 61 हजारांचा गंडा घातल्या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद रामदास पांडुरंग सुरवसे (वय 35, गोकुळ शिरगाव) यांनी दिली. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः प्रिया शर्मा, काव्या कुलकर्णी, नेहा सावंत, अमोल पोवार, राजीवराणे यांच्या नावे असणाऱ्या मोबाईलवरून बोलणाऱ्या व्यक्ती.

हे पण वाचा - या ठिकाणी महाविकास आघाडीचा नवीन फॉर्म्युला...

पोलिसांनी दिलेली माहिती, रामदास सुरवसे गोकुळ शिरगावमध्ये राहतात. त्यांचा येथे कारखाना आहे. त्यांना व्यसासायासाठी पैशाची गरज होती. त्यांनी एका फायनान्स कंपनीतून कर्ज घेतले होते. संबधित कंपनीतून प्रिया शर्मा बोलते असा 16 नोव्हेंबर 2019 ला फोन आला. "तुम्हाला कंपनीने मोठे कर्ज मंजूर केले आहे. तुम्ही "काव्या कुलकर्णी'च्या मोबाईलवरील व्हॉटस्‌ ऍप क्रमांकवर आवश्‍यक कागदपत्रे पाठवा असे सांगण्यात आले. त्यानुसार सुरवसे यांनी कुलकर्णीच्या व्हॉटस्‌ ऍप क्रमांकावर कागदपत्रे पाठवली. त्यानंतर पुन्हा त्यांना नेहा सावंत आणि अमोल पोवार बोलतो असे दोन फोन आले. दोघांनी त्यांना वार्षिक हफ्त्याची एकत्रित रक्कम भरण्यास सांगितले. त्यानंतर जीएसटी, तिकीट, ऑफर एनओसी अकाऊंटची लिमीट रक्कम भरण्यास सांगितले. त्या बदल्यात तुमचे कर्ज 30 लाखांपर्यंत वाढविण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यावर विश्‍वास ठेऊन सुरवसे यांनी भामट्यांनी सांगितलेल्या बॅंक खात्यात पैसे भरले. त्यानंतर पुन्हा संशयित पाच जण वेगवेगळ्या फोनवरून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळू लागली.

हे पण वाचा - बाळाच्या जन्मापासूनच रेडिमेड कपड्यांचा ट्रेंड

त्या भामट्यांनी 31 डिसेंबर 2019 पर्यंत त्यांच्याकडून संशयितांनी 7 लाख 61 हजार उकळल. पैसे देऊनही कर्ज मंजूर होत नाही याबाबत सुरवसे यांनी संबधितांवर फोनवर संपर्क साधण्यास सुरवात केली. मात्र संशयितांनी मोबाईल स्वीच ऑफ केले. अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात सुरवसे यांनी याबाबतची फिर्याद सायबर पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई करीत आहेत.

भामट्यांचा शोध सुरू
फायनान्स कंपनीचे कर्जाचे अमिष दाखवून भामट्यांनी गंडा घालण्यासाठी ज्या चार मोबाईल क्रमांकाचा आधार घेतला होता. त्याआधारे सायबर पोलिसांनी भामट्यांचा शोध सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deception for Businessman in Kolhapur