पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे ड्रोनने: गृहनिर्माणमंत्री

संजय काटे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

- संततधआर पावसाने आता नद्यांना पुर आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावातील शेतीचे मोठे नुकसान होत आहे.

- ज्या भागात असे नुकसान झाले आहे तिथे तलाठी उभा करुन पंचनामे करण्याची परंपरा आता खंडीत करुन थेट ड्रोनचा वापर करुन पंचनामे करुन शेतकऱ्यांचे नुकसान ठरवा.

- गरज पडल्यास गुगल मॅपचाही वापर करा असे आदेश गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी आज श्रीगोंदे येथे दिले.

श्रीगोंदे : संततधआर पावसाने आता नद्यांना पुर आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावातील शेतीचे मोठे नुकसान होत आहे. ज्या भागात असे नुकसान झाले आहे तिथे तलाठी उभा करुन पंचनामे करण्याची परंपरा आता खंडीत करुन थेट ड्रोनचा वापर करुन पंचनामे करुन शेतकऱ्यांचे नुकसान ठरवा, गरज पडल्यास गुगल मॅपचाही वापर करा असे आदेश गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी आज श्रीगोंदे येथे दिले.

श्रीगोंदे येथाल काष्टी, निमगावखलू येथील घोड आणि भीमा नदीकाठच्या गावांतील पुर परिस्थितीची माहिती घेत विखेपाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, पाऊस पाडण्यासाठी सरकार रडार लावत असतानाच निसर्गही सरकारच्या प्रयत्नांच्या मदीतीला धावला. काहीच दिवसात अनेक नद्यांना पुर आल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र त्यामुळे नदीकाठच्या गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. हे नुकसान नेमके किती हे ठरविण्यासाठी नेहमीप्रमाणे तलाठी गावोगावी फिरविण्यापेक्षा आता आधूनिक यंत्रणा वापरावी लागेल.

ड्रोन अथवा गुगल मॅपचा वापर करुन असे नुकसानीचे पंचनामे तातडीने होवू शकतात. अगोदर नुकसानीचा अंदाज घेवून नंतर संबधीतांना तातडीची मदत मिळेल. सरकार दुष्काळातही शेतकऱ्यांसोबत होते आणि आता अतिवृष्टीतही सोबत आहे. ज्या भागात पाऊस कमी असतानाही जनावरांच्या छावण्या बंद करण्याचे आदेश झाले आहेत तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यात बदल करु असेही विखेपाटील म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decide damages of flood-hit areas with the help of drone said Minister of Housing