स्वच्छ-सुंदर राहुरीचा संकल्प 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

राहुरी (नगर) : स्वच्छ-सुंदर राहुरीसाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून सोडण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या गणेश मंडळांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येईल, असे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. 

नगरपालिका सभागृहात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल (ता. 1) बोलत होते. या वेळी 27 गणेश मंडळांचे पदाधिकारी हजर होते. स्वच्छता मोहिमेत सातत्य राहावे, स्वयंसेवी संघटना व नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेऊन लोकसहभाग वाढावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. स्पर्धेच्या परीक्षणासाठी पत्रकारांची समिती स्थापन करणार असल्याची घोषणा तनपुरे यांनी केली. चांगले काम करणाऱ्या गणेश मंडळांना अनुक्रमे 71 हजार, 51 हजार, 21 हजार, तसेच अन्य पाच मंडळांना उत्तेजनार्थ बक्षिसे, गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. सर्व मंडळांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल. 

केंद्र सरकारचे स्वच्छतादूत भाऊसाहेब येवले यांनी स्वच्छता राखण्यासह पर्यावरण, लोकसहभाग, सुशोभीकरणाबाबत मार्गदर्शन केले. चर्चेत ऍड. राहुल शेटे, वैभव ओस्तवाल, संजय कुलकर्णी, योगेश मुसळे, वैभव ओस्तवाल, सुनील पवार, प्रसाद मैड, गणेश कोहकडे, अजित जाधव, नितीन काशीद, आयुब पठाण, सुनील शिंदे आदींनी सहभाग घेतला. 

Web Title: decide to keep clean rahuri