दोन दिवसात निर्णय द्या ; पालिकेची हॉकर्स संघटनांना सूचना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

शहरातील मध्य वस्तीतील कर्मवीर भाऊराव पुतळ्यापासून जाणारा रस्ता हॉकर्ससाठी देऊ असा प्रस्ताव पालिकेने हॉकर्स संघटनेस दिला आहे.

कऱ्हाड : शहरातील मध्य वस्तीतील कर्मवीर भाऊराव पुतळ्यापासून जाणारा रस्ता हॉकर्ससाठी देऊ असा प्रस्ताव पालिकेने हॉकर्स संघटनेस दिला आहे. पालिकेने अतिक्रमण हटाव मोहिम राबविली त्याला विरोध करत संघटनेने पालिकेत दिवसभर ठिय्या मांडला.
 
काल सायंकाळी चारनंतर ठिय्यास बसलेल्या हॉकर्सना मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी चर्चेस बोलवले. त्यात वरील प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावानुसार पालिकेकडे 2014 ची नोंद असलेल्या 80 हातगाडे धारकांना तेथे जागा देण्यात येणार आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले. त्याशिवाय अन्य काही पर्याय देण्यात आले आहेत. त्यावर दोन दिवसात निर्णय द्यावा, असेही पालिकेने हॉकर्स संघटनेस सांगितले आहे.

Web Title: Decide in two days Notice to Municipal Hawkers Organization