उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या अटकपूर्व जामीनावर आज निर्णय  

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 25 एप्रिल 2018

कोजागरी पोर्णिमेच्या दिवशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरुची बंगल्या बाहेर वाद झाला होता. दोन्ही गटांनी त्यासंदर्भात पोलिसांत एकमेकांविरोधात तक्रार केली होती. 

सातारा : कोजागरी पोर्णिमेच्या दिवशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरुची बंगल्या बाहेर वाद झाला होता. दोन्ही गटांनी त्यासंदर्भात पोलिसांत एकमेकांविरोधात तक्रार केली होती. 

आज दोन्ही ही लोकप्रतिनिधी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही गटातील वकिलांनी त्यांचे म्हणणे मांडले. जिल्हा व सत्र न्यायाधिश यो.ही.अमेटा यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या जामीन अर्जावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. आजचा निर्णय ऐकण्यासाठी दोन्ही गटातील समर्थक मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात उपस्तित आहेत.

Web Title: decision on the anticipatory bail of Udayan Raje and Shivendra Raje