शिक्षण खात्याचा निर्णय : बेळगावात तब्बल एवढ्या शाळांना येणार नोटीस

मिलिंद देसाई
Friday, 14 August 2020

राज्यातील 62 शाळांचा निकाल यावेळी शुन्य टक्‍के लागला आहे.

बेळगाव : राज्यातील 62 शाळांचा निकाल यावेळी शुन्य टक्‍के लागला आहे. यामध्ये अनुदानरहीत शाळांची संख्या अधिक असुन ज्या शाळांचा निकाल शुन्य टक्‍के लागला आहे. त्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यानुसार शाळांना नोटीस बजावण्यात येणार असुन निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण खात्याने जिल्हानिहाय निकाल जाहीर केला आहे. यानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्हाचा निकाल 59. 82 टक्‍के इतका लागला आहे.

 
शिक्षण खात्याकडुन निकाल वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. तरीही अनेक शाळांच्या निकालात मोठी घसरण झाल्याचे दिसुन आले आहे. यावेळी राज्यातील 4 सरकारी माध्यमिक शाळा, 11 अनुदानित शाळा व 47 विना अनुदानित शाळांचा निकाल शुन्य टक्‍के लागला आहे. गेल्या वर्षी 46 शाळांचा निकाल शुन्य टक्‍के लागला होता. जुन महिन्यात दहावीची परीक्षा झाली होती यावेळी परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्याचा निकाल कमी प्रमाणात लागला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिका फेर तपासणीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा- कोरोनाच्या संकटातही स्वप्नांचा पाठलाग : कोल्हापूरातील धाडसी तरुणांचा प्रेरणादायी प्रवास -

राज्यातील 501 सरकारी माध्यमिक शाळा, 139 अनुदानित शाळा व 910 अनुदानरहीत शाळांचा निकाल 100 टक्‍के लागला आहे. 2019 मध्ये 1626 शाळांजा निकाल शुन्य टक्‍के लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 100 टक्‍के निकाल लागलेल्या शाळांची संख्या कमी प्रमाणात  आहे. 

हेही वाचा- हलशीवाडीत वाट चुकुन गावात आले चितळ कुत्र्यांनी केला हल्ला अन् -

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडुन मागितला आहे. सर्व शाळांचा निकाल मिळाल्यानंतर शैक्षणिक जिल्हातील ज्या शाळांचा निकाल कमी प्रमणात लागला आहे. त्या शाळांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. 
अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision of the Department of Education notice for 62 schools in the state is zero percent result