मंगळवेढ्यात दुष्काळ जाहीर करा : राष्ट्रवादी काॅग्रेस

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा : तालुक्‍यातील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपून गेल्‍यामुळे त्‍वरीत पंचनामे करुन दुष्‍काळ जाहीर करावा व तालुक्‍यातील तलाव व छोटे मोटे नाले व शहरातील कृष्‍ण तलाव उजनी व अन्य पाण्याने त्‍वरीत भरुन घेण्‍यात यावेत. अन्‍यथा तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्‍याचा इशारा राष्ट्रवादी काॅग्रेसच्या वतीने देण्यात आला. 

याबाबतचे निवेदन नायब तहसिलदार यांना देण्यात आले. त्‍याप्रसंगी सोलापूर जिल्‍हा राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी, सामाजिक न्‍याय विभाग जिल्‍हाध्‍यक्ष विजय खवतोडे, सरचिटणीस लतीफ तांबोळी, सेवादल अध्‍यक्ष विलास चेळेकर, तालुकाध्‍यक्ष सुनिल डोके, शहराध्‍यक्ष अजित जगताप, नगरसेविका अनिता नागणे, सब्‍जपरी मकानदार, प्रविण खवतोडे बशिरभाई बागवान, भारत बेद्रे, विजय बुरकुल, संजय पाटील, महाविर ठेंगील, संदिप घुले, पंडीत गवळी, संतोष राऊत, अमोल माने, सुभाष बाबर, प्रदिप पवार, महादेव गायकवाड जावेद मुल्‍ला, चंद्रकांत चेळेकर.नजिरभाई इनामदार, नबीलाल बागवान,गौरीशंकर बुगडे,भिमराव पडवळे,सुनिल जाधव, प्रकाश येलपले, कुलदिप जाधव,महादेव मुदगुल, राजु बेद्रे, सागर यादव, सोमनाथ बुरजे, विकास भगरे, योगेश माळी, आबा बाबर, सुभाष भंडारे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की तालुक्‍यात खरीप हंगाम 2018 मध्‍ये 24772 हेक्‍टर क्षेत्रावरती पेरणी झाली. तालुका रब्‍बीचा असला तरी सध्‍या खरीपाचे क्षेत्र वाढले आहे.  मे महिन्‍यामध्‍ये विविध हवामान खात्‍याने सरासरीपेक्षा जास्‍त पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. मृगात पडलेल्‍या अल्पशा पावसावर बाजरी, मुग, उडीद, तूर, मका अन्‍य पिकांची पेरणी केली, परंतु पावसाने ओढ दिल्याने पिके वाळुन चालली.  कांदा लागवडही धोक्‍यात आलेली आहे  जनावरांच्‍या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  तालुक्‍यात दुष्‍काळसदृश्‍य परिस्थिती निर्माण झालेली आहे. 

तालुक्‍यात प्रत्‍येक मंडलानुसार पर्जन्‍यमापक बसवावेत व ते अद्ययावत असावेत. सध्या शहरातील असलेल्‍या पर्जन्‍यमापकावरुन पावसाची आकडेवारी घेतली जाते ती अन्‍यायकारक आहे. 2017 मधील पिकविमा मंजूर झाला नसल्‍यामुळे शेतक-यांची फसवणुक झाली आहे. शासनाने खरीप पिकांचे सरसकट पंचनामे करुन त्‍वरीत शेतक-यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी व तालुका दुष्‍काळ जाहीर करावा. उजनी धरण 100 टक्‍के भरल्‍यामुळे तालुक्‍यातील छोटे मोठे तलाव, शहरानजिकचा कृष्‍ण तलाव भरुन द्यावा. तसेच कॅनॉलाही पाणी सोडण्‍यात यावे.  अन्‍यथा मंगळवेढा तहसिल समोर शेतकरी व राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्‍या वतीने आमरण उपोषण करुन तीव्र आंदोलन छेडण्‍यात येईल. असा इशारा देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com