एसटी अपघातांत घट

दौलत झावरे
सोमवार, 13 जानेवारी 2020

"बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या ब्रीदवाक्‍यानुसार एसटीचा कारभार सुरू असला, तरी अपघातविना सेवा देण्याचा नवीन उपक्रम नगर विभागाने हाती घेतला आहे.

नगर : "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या ब्रीदवाक्‍यानुसार राज्य परिवहन महामंडळाचा कारभार सुरू आहे. नगर विभागातर्फे विनाअपघात सेवेसाठी विशेष परिश्रम घेण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत दहा अपघात कमी करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. आगामी वर्षात हा आकडा शून्य करण्यासाठी आता सर्वांनी कंबर कसली आहे.

उघडून तर बघा- ...तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील : गडाख 

"बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या ब्रीदवाक्‍यानुसार एसटीचा कारभार सुरू असला, तरी अपघातविना सेवा देण्याचा नवीन उपक्रम नगर विभागाने हाती घेतला आहे. त्या दृष्टीने विभागनियंत्रक विजय गिते, वाहतूक अधीक्षक दादासाहेब महाजन यांनी नियोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यातील अकरा आगारांचे पालकत्व अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्याकडून बसस्थानकातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. 

गतवर्षाच्या तुलनेत दहा अपघात कमी

याच अधिकाऱ्यांकडून एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तसेच, चालक व वाहकांशी संवाद साधून विनाअपघात सेवा देण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. या योजनेमुळे चालक- वाहकांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविल्या जात आहेत. मागील वर्षी एसटीचे 145 अपघात झाले होते; या वर्षी 135 झाले. गतवर्षाच्या तुलनेत दहा अपघात कमी झाले आहेत. हाच आकडा शून्य करण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आता कंबर कसली आहे. 

ठळक बातमी- जिल्हा रुग्णालयातून आरोपी पसार

विनाअपघात सेवेसाठी विशेष लक्ष

अपघात नेमके कधी व कोठे होतात, याची माहिती नगर विभागातर्फे या वर्षी घेण्यात आली आहे. यंदाच्या 135 अपघातांमध्ये 85 अपघात 25 ते 45 वयोगटातील चालकांकडून झाले आहेत. तसेच, 45 ते 58 वयोगटातील चालकांकडून फक्त 50 अपघात झाले. त्यामुळे 25 ते 45 वयोगटातील चालकांचे जास्त प्रबोधन करून त्यांच्याकडून विनाअपघात सेवेसाठी विशेष लक्ष दिले जात आहे. 

असे झाले अपघात

चौपदरी रस्त्यांवर : 61 
दुपरी व ग्रामीण रस्त्यांवर : 74 

अपघात होण्याची वेळ

दुपारी बारा ते सहा : 56 
रात्री बारा ते सकाळी सहा : 6 

अपघातांचे प्रमाण शून्य व्हावे

मागील वर्षीच्या तुलनेत एसटीचे दहाच अपघात कमी झाले. आगामी वर्षात आम्ही अपघातांचे प्रमाण शून्य व्हावे, यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यात आम्हाला निश्‍चितच यश मिळेल. 
- विजय गिते, विभागनियंत्रक, नगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease in ST accidents marathi news