माझ्या जीवितास काही झाल्यास दीपाराणी कोळेकर जबाबदार

कर्जमाफी योजनेत शासनाची फसवणुक
Anand Pawar
Anand Pawarsakal

देवराष्ट्रे : पाडळी येथील सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन व सचिव यांनी कर्जमाफी योजनेत (karj mukti yojana) शासनाची फसवणुक करुन अपहार केला आहे. याबाबत संबंधित अधिकार्याकडे तक्रार करुनही दखल घेत नसल्याने आमरण उपोषण (fast unto death)करण्याचा इशारा पाडळी येथील आनंद पवार यांनी दिला आहे.

Anand Pawar
UP निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, योगींचा मतदारसंघ ठरला

निवेदनात म्हटले आहे की, पाडळी सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन व सचिव यांनी संगनमताने नियमबाह्यरित्या चेअरमन यांच्या कुटुंबातील सदस्यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ (mahatma phule karj mukti yojana) दिला आहे. यामुळे शासनाची फसवणुक झाली असुन अपहार झाला आहे. याबाबत कडेगाव तालुका सहाय्यक निबंधकाकडे तक्रार करुनही याबाबत दखल घेतली नाही. तरी दोषीवर कडक कारवाइ करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा दि. 20 पासुन पाडळी सोसायटी समोर आमरण ऊपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या प्रकाराने सोनहिरा परिसरात एकच खळबळ ऊडाली आहे.

माझ्या जिवितास काही झाले तर सर्वस्वी कडेगाव सहाय्यक निबंधक दीपाराणी कोळेकर या जबाबदार राहतील.

-आनंद पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com