praniti shinde
praniti shinde

प्रणितीसाठी धोक्‍याची घंटा कोठेंचा मार्ग सुकर

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात "शहर मध्य'मध्ये भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना सुमारे 37 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही धोक्‍याची घंटा आहे, तर भाजप- शिवसेना युतीकडून इच्छुक असलेल्या महापालिकेतील विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  महेश कोठे यांचा मार्ग सुकर झाल्याचे संकेत आहेत. 

लोकसभा निवडणूक ही आगामी विधानसभेची रंगीत तालीम होती. या रंगीत तालमीत भाजपने उल्लेखनीय यश मिळवले, जोडीला शिवसेना होती. त्यामुळे आता या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असणार आहे. या मतदारसंघात आमदार शिंदे यांनी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत एमआयएमच्या तौफिक शेख यांचा 9769 मतांनी पराभव केला होता. शिवसेनेचे महेश कोठे तिसऱ्या, भाजपच्या मोहिनी पतकी चौथ्या तर माकपचे नरसय्या आडम पाचव्या स्थानावर गेले. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची  युती होता- होता फिस्कटली. त्यामुळे भाजपच्या पतकींना मिळालेली 23 हजार मते कॉंग्रेसच्या पथ्थ्यावर पडली. युतीत जागा शिवसेनेकडे असती तर कोठे विजयी झाले असते. 

यंदा युतीची घोषणा यापूर्वीच झाली आहे. ही जागा शिवसेनेला मिळेल याचा दावा केला जात असला तरी, यंदा भाजपकडून महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डीही इच्छुक आहेत. याच मतदारसंघातून लढण्याचे रणशिंग आडम मास्तर यांनी फुकले असले तरी, त्यांचा एमआयएमला विरोध आहे. त्यातच आता तौफिक शेख एका प्रकरणात अडकल्याने वंचित बहुजन आघाडी तौफिक शेख यांच्याबरोबर राहते की आडम यांना पाठिंबा देते यावर सर्वकाही अवलंबून आहे. माकप आणि एमआयएमने स्वतंत्र उमेदवार उभा केला तर वंचितची मते विभागली जातील. भाजप-शिवसेना युतीत ही जागा भाजपकडे गेली तर महेश कोठे कोणती भूमिका घेणार यावर या मतदारसंघाची गणिते बदलतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com