देगाव ग्रामपंचायत जिल्हास्तरीय विशेष पुरस्काराने सन्मानित

दावल इनामदार
शुक्रवार, 22 जून 2018

ब्रह्मपुरी (सोलापूर)- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमधील तालुका व जिल्हास्तरीस पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सन २०१७-१८ चा जिल्हा परिषद कडील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभियान जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार देगाव (ता.मंगळवेढा) येथील ग्रामपंचायतीस मिळाला. तसेच तालुका स्तरावर दुसरा क्रमांकाचे पुरस्कार मिळाला.

पारितोषिक वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष संजय (मामा) शिंदे जि.प. सोलापूर, पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुंडेवार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड जि. प सोलापूर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बांधकाम व अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोड  उपमुख्य कार्यकारी अधिकार परमेश्वर राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अविनाश गोडसे आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत देगाव येथील ग्रामसेविका  राखी जाधव यांनी १ ते ३३ नमुने संगणकद्वारे देण्यासाठी प्रयत्न केले.मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत १००% ऑनलाईन करुन पेपरलेस होण्याचा पहिला बहुमान मिळविले.गावामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आर. ओ. बसवून ग्रामपंचायत आय.स.ओ. व हागनदारी मुक्त करण्यात आले.गावात सांडपाणी व्यवस्था भुमीगत गटार व शोषखड्डे बांधून करण्यात आले गावात CCTV बसवून सनियंत्रणाचे काम केले आहे. तसेच मयत लोकांच्या स्मरणार्थ गावामध्ये वृक्षरोपण करण्यात आले आहे.

सदर पुरस्कारासाठी राखी जाधव ग्रामसेविका, सरपंच मंगल बनसोडे, शिवाजी माने, बलभीम ढेकले, शरद डोइफोडे, समाधान बनसोडे, सुरेश ढेकळे आदी यांनी परिश्रम घेतले. पुरस्कार मिळाल्याने गावातून व तालुक्यातून कौतुक होत आहे.

Web Title: degaon grampanchayat got award