

शिक्षकांनी वर्गासमोर त्याला “तू ये ड्रामा करतोस”; “रोणे का ड्रामा बंद कर” असे म्हणत अपमानित केल्याचे आरोप आहेत.
esakal
Sangli Student Teacher Harassment : शाळेत प्रॅक्टिस करताना शौर्य पाय घसरून पडला. शिक्षिका म्हणाल्या, ‘तू ड्रामा करता है...’ शिक्षकांनी छळलं होतं त्याला. शाळा बदलायची होती आम्हाला, मात्र दहावीचं वर्ष. त्यामुळे थांबलो... आत्महत्या केलेल्या शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांचे हे शब्द सुन्न करणारे होते. शौर्यच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या श्री. पाटील शिक्षकांच्या त्रासाने व्यथित झाले होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. शौर्य व त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात सारा ढवळेश्वर गाव सुन्न आहे. शौर्य दिल्लीत राहायचा; पण त्याच्या आत्महत्येने इथला एकेक माणूस हळहळला आहे.