निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

लाच प्रकरणी निलंबित करण्यात आले
चौकशीची मागणी
चौकशीची मागणीSakal

सांगली - लाच प्रकरणी निलंबित करण्यात आलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व कक्ष अधिकारी सोनवणे यांनी बेकायदेशीरपणे संगनमताने मंजूर केलेली वैयक्तिक मान्यता प्रस्तावांची चौकशी करावी. यात सुमारे ८० ते १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे संघटक सरचिटणीस दीपक माने यांनी केला आहे.

कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना माने यांनी निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे, की निलंबित शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व कक्ष अधिकारी सोनवणे नुकतेच लाच घेताना रंगेहात सापडले आहेत. या दोघांनी जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालकांशी संगनमत करून सव्वा तीनशे ते साडेतीनशे वैयक्तिक मान्यता प्रस्ताव बेकायदेशीरपणे मंजूर केले आहे. सदर प्रस्तावात जोडलेली कागदपत्रे बनावट आहेत हे माहीत असूनही नियोजितपणे कटकारस्थान करून उमेदवारांकडून ८० ते १०० कोटी रुपये घेऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे.

या वैयक्तिक मान्यता प्रस्तावांची सखोल चौकशी करावी. बेकायदेशीरपणे मंजूर केलेल्या मान्यता रद्द कराव्यात. दोषींवर योग्य ती कडक कारवाई करावी. अन्यथा भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी भाजप ओबीसी युवा अध्यक्ष राहुल माने, बबलू आलमेल उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com