esakal | सौंदत्ती यल्लम्मा देवी दर्शन व यात्रेला परवानगीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी I Yallamma Devi
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Jadhav Statement

सौंदत्ती यल्लम्मा देवी दर्शन व यात्रेला परवानगीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

sakal_logo
By
विनायक जाधव

बेळगाव - सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीची यात्रा १९ ऑक्टोबर रोजी होत असून यादिवशी प्रशासनाने कोरोना नियमांच्या चौकटीत सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवून यात्रेला परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेना रिक्षा सेनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा शिवसेना रिक्षासेना प्रमुख राजेंद्र जाधव यांनी सदर मागणीचे निवेदन बेळगावचे निवासी जिल्हाधिकारी अशोक दुरगुंटी यांच्याकडे सादर केले. निवेदनात, सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाविक येतात. मात्र, मागील दोन वर्षे कोरोनो आपत्तीमुळे मंदीर बंद ठेवून सलग दोन वर्षे यात्रा रद्द केली होती . सध्याची परिस्थिती पाहता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. याचा विचार करून सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे मंदीर देखील कोरोना नियमांचे पालन करून दर्शनासाठी खुले ठेवावे तसेच नियमाच्या चौकटीत यात्रेला अनुमती द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा: खेळ कुणाला दैवाचा कळला?

कोरोना करिता असलेल्या इतर नियमांबरोबर ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत अशा लोकांसाठी यात्रेत सहभागी होण्यास परवानगी द्यावी. त्यामुळे स्थानिक रोजगारास चालना मिळेल व अनेक भक्तांनाही दर्शनाचा लाभ होईल, असे सांगत १९ रोजी सौंदत्ती येथील यल्लम्मा देवी यात्रेसाठी कायदेशीर बाबी पाळून प्रशासनाने यात्रेस परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली. निवेदन देताना बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर, जिल्हा संघटक रवींद्र जाधव, महेश टंकसाळी, म. ए. समिती युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष सुरज कुडूचकर, अंकुश केसरकर, शिवसेना विभाग प्रमुख प्रसाद काकतकर, विभाग प्रमुख राजू कणेरी, कोल्हापूर रिक्षासेनेचे उमेश मेढे, मोहन बागडी, रितेश जाधव, विक्रम आमगावकार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

loading image
go to top