बेळगाव - मिरज मार्गावर गाड्यांसाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

मिरज - पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात रेल्वेचे जाळे वाढवण्याची मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ माने यांनी केली आहे. तसे पत्र रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना दिले.  

मिरज - पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात रेल्वेचे जाळे वाढवण्याची मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ माने यांनी केली आहे. तसे पत्र रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना दिले.  

पत्रात म्हटले आहे कि, सांगली आणि बेळगाव विभागात गाड्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. अनेक मार्गांवर पुरेशा गाड्या नाहीत. पुण्यातून जम्मूला धावणारी वैष्णवी एक्सप्रेस बेळगावातून मिरजमार्गे सोडता येईल. बेळगावातून मिरजमार्गे इंदोर गाडीचीही व्यापारीवर्गाची मागणी आहे. बेळगाव ते किर्लोस्करवाडी दरम्यान सकाळी व संध्याकाळी डेमू सुरु केल्यास हजारो प्रवाशांची सोय होईल. हुबळीहून बेळगाव - मिरजमार्गे पटना एक्सप्रेस सोडल्यामुळे हजारो बिहारी कामगारांना थेट गाडी मिळेल. बेळगाव - मुंबई, पंढरपूर - कराड या गाड्यांचीही गरज आहे.  

रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांनी बेळगावच्या रेल्वे विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. बेळगाव - बंगळूर सुपरफास्ट एक्सप्रेस नुकतीच सुरु केली. बंगळूर - कोल्हापूर धावणाऱ्या राणी चन्नम्मा एक्सप्रेसला नवे डबे देऊन कायापालट केला. सर्व एक्सप्रेस गाड्यांत बेळगावमध्ये पाणी भरण्याची सोय केली. आता बेळगावमधून मुंबई व उत्तर भारतात गाड्या सोडण्यासाठी प्रवाशी त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.

साताऱ्यात दुहेरीकरणात अडथळे

यासंदर्भात पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर म्हणाले, पुणे - मिरज दुहेरीकरण झाल्याशिवाय या मार्गावर गाड्या वाढवता येणार नाहीत. दुहेरीकरणाचे काम गतीने सुरु आहे, पण साताऱ्यात अडथळे येत आहेत. पन्नास वर्षांपुर्वी रेल्वेने जागा राखीव ठेवली होती, तेथे शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत. ते जागा सोडायला तयार नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand of increase trains on Belgaum Miraj track to Minister of State for Railways