esakal | 'ॲपेक्स'च्या मान्यतेचीही CBI चौकशी लावा; आशिष शेलारांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

'ॲपेक्स'च्या मान्यतेचीही CBI चौकशी लावा; आशिष शेलारांची मागणी

'ॲपेक्स'च्या मान्यतेचीही CBI चौकशी लावा; आशिष शेलारांची मागणी

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : मिरजेतील ॲपेक्स रुग्णालयात ८० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. या हॉस्पिटलला कशा प्रकारे परवानगी दिली, त्यावेळी आवश्यक कादगपत्रे तपासणी नव्हती का? नियमांचे पालन झाले नाही का? या बाबी समोर आल्याच पाहिजेत. या प्रकरणाची आणि महापालिका आयुक्तांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात

आयुक्तांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारे दबावतंत्र करू नये, आम्ही ते खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, "ॲपेक्स कोविड हॉस्पिटलमध्ये ८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याला डॉक्टर व हॉस्पिटल व्यवस्थापनाचा निष्कळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. तसेच या हॉस्पिटलबाबत पहिल्या लाटेतही तक्रार आल्या होत्या. याकडे दुर्लक्ष करत दुसऱ्या वेळी पुन्हा हॉस्पिटलसाठी परवाना देण्यात आला. हा परवाना देताना आवश्यक कागदपत्रे, नियम व अन्य बाबी तपासल्या नसल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावून धरले आहे. याबाबत अधिवेशनात हा विषय उपस्थित करण्यात येणार होता मात्र दोनच दिवस अधिवेशन चालले. त्यातही काय झाले, हे साऱ्यांनी पाहिले आहे. अधिनेवशनात हा विषय उपस्थित करता आला नाही, मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जावून भाजप याची तड लावेल."

हेही वाचा: आइस क्यूबमुळे चेहऱ्याला होतात फायदे; जाणून घ्या वापरण्याची पद्धत

ॲपेक्स प्रकरणी महापालिका आयुक्तांनी माध्यमांना नोटीस बजावल्या आहेत. त्याबाबत माहिती घेऊन शेलार म्हणाले, "मी या प्रकरणात आयुक्तांचा निषेध करतो. हा दबाबतंत्राचा एक भाग आहे. अशा प्रकारे लिहणाऱ्यांना लिहू दिले जात नसेल, बोलणाऱ्यांना बोलू दिले जात नसेल तर याची गंभीर दखल भाजपने घेतली आहे. असले दबावतंत्र, मुस्कटदाबी खपवून घेणार नाही. या प्रकरणी आयुक्तांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. तशी मागणी भाजपच्यावतीने मी करणार आहे. यातील दोषींना शासन झाल्याशिवाय स्वस्थ्य बसणार नाही."

loading image