इंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने तातडीने वाघाळे तलावामध्ये तिन्ही गावातील ग्रामस्थाकडून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने तातडीने वाघाळे तलावामध्ये तिन्ही गावातील ग्रामस्थाकडून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.

निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तिन्ही गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी वाघाळे तलावालगत आहे. चालू वर्षी सकाळ रिलिफ फंड व बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने वाघाळे तलावातील गाळ काढला आहे. मात्र पाउस नसल्यामुळे सध्या तलाव कोरडा पडला असल्यामुळे तिन्ही गावातील पाणी पुरवठा योजना बंद पडल्या असुन आठ दिवसातुन एकदा पाणी येत आहे. नीरा डाव्या कालव्याच्या ५७ क्रंमाकाच्या वितरिकेमधून या तलावामध्ये पाणी सोडण्याची सोय आहे.दरवर्षी या तलावामध्ये पाटबंधारे विभागाच्या माध्यमातुन पाणी सोडण्यात येते. ग्रामपंचायतींनी १८ ऑगस्ट पासुन पाटबंधारे विभागापासुन जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याची मागणी करुन ही तलावामध्ये पाणी सोडण्यास टाळाटाळ होत असल्याने आज तिन्ही गावाच्या सरपंच व ग्रामस्थांनी निरवांगी मध्ये बैठीकेचे आयोजन केले होते. यावेळी तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी अाक्रमक भूमिका घेत पाणी सोडण्याची मागणी केली. पाण्यासाठी बुधवार (ता.१७) रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असुन पाणी न सोडल्यास शुक्रवार (ता.१९) रोजी वितरिकेचे गेटचे कुलूप तोडून पाणी तलावामध्ये सोडण्याचा इशारा सरपंच सुखदेव बाबर, माजी सरपंच दशरथ पोळ, दत्तात्रेय पोळ, दादासो काळे, दादा सुर्यवंशी, निवास सुर्यवंशी, रमेश दुधाळ, धनाजी केसकर, श्रीरंग रासकर, शशिकांत सुर्यवंशी, श्रीरंग रासकर, भागवत मोरे यांनी दिला आहे.

यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे साहय्यक अभियंता विजय नलवडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तलावामध्ये पाणी सोडण्याचा अधिकारी जिल्हाधिकारी यांना असुन त्यांनी आदेश दिल्यानंतर तातडीने पाणी सोडण्याचा येईल.

Web Title: Demand to release water in Waghale lake in Indapur taluka ...