
सोलापूर ः महापालिकेकडे असलेली थकीत रक्कम देऊन आमच्या आयुष्याच्या सायंकाळी "अच्छे दिन' आणावेत, अशी अपेक्षा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. सेवानिवृत्ती दिनानिमित्त महापालिकेत आयोजिलेल्या कार्यक्रमात ही भावना व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा... धक्कादायक... फक्त 13 आरक्षण विकसीत
मागण्यांचा करावा प्रशासनाने विचार
सुरवातीला जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष डी.डी.नागराशी यांनी पेन्शनर संघटनेच्या मागणी संदर्भात निवेदन दिले. महापालिकेच्या निवृत्त सेवकांचा पाचवा वेतन आयोगाचा फरक, सहाव्या वेतन आयोगाचा फरक, महागाई भत्ता आदिं मागणींचा विचार करण्यात यावा व या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हांस सहकार्य करावे असे आपले मनोगत व्यक्त केले. आर.ए.अयाचित यांनी निवृत्त सेवकांचा समाजातील व कुटुंबातील व्यथा आणि प्रशासनाकडून प्रलंबित फरक व इतर मागण्या संदर्भात आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.
हेही वाचा.... अपघात रोखण्यासाठी फोर ई चा वापर
सेवानिवृत्तीनंतर जगावे आनंदाने.....
सेवानिवृत्तीने वयाची जाणीव करुन दिलेली असते, शरीर कुरकुरायला लागते. बुद्धी अन् मनाचे विचार काय कमावले आणि काय गमावले याचा ताळेबंद मांडत असतात. काय काय करायचे राहिले याचा विचार सुरु होतो. सप्तसुरांचे संगीत मनाला भुरळ पाडते. पु.ल., गदिमा, कुसुमाग्रज... सारे जवळचे वाटायला लागतात. सेवानिवृत्तीनंतर खरतर आयुष्यातला एक नविन टप्पा, नविन मार्ग, 'स्व'चा शोध घेण्याचा श्री गणेशा! सुरुवात अशी की जी सहज असावी, आनंद देणारी अन् आनंद घेणारी असावी. 'हृदयातून' अन् हृदयाच्या प्रत्येक 'स्पंदना'तून असावी. जगण्याची उर्मी असावी, जगण्याची स्फुर्ती असावी. खरतर ही एक नविन ओळख असते, स्वतःची स्वतःशी झालेली! तीस-चाळीस वर्षांच्या 'वृत्ती'तून म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार, सुख-दु:ख यातून बाहेर पडण्याची वेळ. 'सेवानिवृत्ती' स्वीकारायची, 'वृत्ती' सोडायची, पण निवृत्त व्हायचे नाही. आयुष्याच्या दैवी देणगीतून निवृत्त व्हायचे नाही. ज्या ज्या वेळेला जे जे होईल, ते ते स्वीकारत जायचे, अगदी सहजतेने अन् आनंदाने. आनंदाचा शोध घेत मार्गस्थ होणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य बाकी राहते.
हा पहा कार्यक्रम (VIDEO)
आयुष्याच्या संध्याकाळी होतेय फरफट
वयं झालं की सरकारी सेवेतून निवृत्तीचे वेध लागतात. नोकरीच्या शेवटच्या काही महिन्यांत पेन्शनच्या कागदपत्रांची जमवा-जमव करण्यात वेळ जातो. निवृत्तीनंतर मात्र पेन्शन कधी मिळेल, हे सांगणं अवघड. कार्यालय, बॅंकांमध्ये चकरा मारूनही काम होत नाही, असाच अनुभव येतो. मासिक निवृत्तिवेतन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत दिले जावे, निवृत्तीधारकांना "पीपीओ बुक' तातडीने उपलब्ध करून द्यावेत, भविष्य निर्वाह निधीची रक्कम तातडीने मिळावी, एक सप्टेंबर 2006 रोजी जाहीर केलेला महागाई भत्ता तात्काळ मिळावा, वेतन निश्चिती करून फरक मिळावा, वैद्यकीय भत्ता मिळावा; तसेच अनुकंपाधारकांना नोकऱ्या मिळाव्यात, या सेवानिवृत्तांच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण होत नसल्याचे दिसून येत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.