छानच की...अपघात रोखण्यासाठी आता 'फोर-ई' चा उपाय

accident
accident
Updated on

सोलापूर : राज्यातील रस्ते अपघात अन्‌ मृत्यू कमी करण्यासाठी राज्य परिवहन आयुक्‍तालयाने रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून ठोस कृती आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये अंमलबजावणी (इर्न्फोसमेंट), इंजिनिअरिंग, शिक्षण (एज्युकेशन), ईमरजन्सी केअर (अत्यावश्‍यक रुग्णसेवा) याचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रस्ते अपघात अन्‌ मृत्यू किमान 10 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा इष्टांक देण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारी ते ऑक्‍टोबरपर्यंत 5.5 टक्‍के अपघाती मृत्यू कमी झाले आहेत.

 

हेही वाचाच...ग्रामपंचायतीचा कर भरण्यासाठी 'येथे' सोन्याची अंगठी


अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, सातारा, लातूर, नागपूर व नागपूर शहर, औरंगाबाद व अमरावती शहर याठिकाणी अपघात वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर वाढते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने आता पोलिस निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य परिवहन आयुक्‍त शेखर चन्ने यांनी दिले आहेत. दरम्यान, अपघात झाल्यानंतर रुग्णांच्या पोलिस चौकशीपेक्षा उपचाराला प्राधान्य द्यावे, अशा सूचना राष्ट्रीय अथवा राज्य मार्गालगतच्या रुग्णालयांनाही देण्यात आल्या आहेत. राज्यातील एक हजार 324 ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) कमी करुन त्याठिकाणी ठोस उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हा स्तरावरील रस्ता सुरक्षा समितीला पाठविण्यात आले आहे. जानेवारी ते ऑक्‍टोबर 2018 च्या तुलनेत यावर्षी वाशिम, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक शहर, नवी मुंबई या ठिकाणचे अपघात कमी झाल्याची माहिती आयुक्‍तालयाने दिली.


हेही वाचाच... अबब...'यांना' दरमहा 40 लाखांच्या वसुलीचे उद्दिष्टे


अपघात दोन हजाराने झाले कमी
राज्यातील वाढते रस्ते अपघात अन्‌ मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार अंमलबजावणी (इर्न्फोसमेंट), इंजिनिअरिंग, शिक्षण (एज्युकेशन), ईमरजन्सी केअर (अत्यावश्‍यक रुग्णसेवा) अशा 'फोर-ई' चा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अपघात अन्‌ मृत्यूचे प्रमाण 10 टक्‍क्‍यांनी कमी करावे, अशा सूचना संबंधित जिल्ह्यांना दिल्या असून ऑक्‍टोबरपर्यंत 600 मृत्यू कमी झाले आहेत.
- जितेंद्र पाटील, सहपरिवहन आयुक्‍त, रस्ता सुरक्षा, मुंबई


हेही वाचाच...नक्‍की वाचाच...अशी होणार 2021 ची जनगणना


राज्यातील अपघाताची स्थिती
जानेवारी ते ऑक्‍टोबर 2018
29,350
मृत्यू
10,873
जखमी
26,084
जानेवारी ते ऑक्‍टोबर 2019
27,363
मृत्यू
10,275
जखमी
24,032

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com