बाजारात विक्रीला आलेय डेमो व्होटिंग मशिन !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

सोलापूर - मतदारांना घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि आपल्या पक्षाला, उमेदवाराला त्यांनी मतदान करावे, यासाठी कार्यकर्त्यांना आटापिटा करावा लागतो. रात्रंदिवस प्रचार करूनही गोंधळले अनेक मतदार दुसऱ्याला मत देतात. हे टाळण्यासाठीच डेमो व्होटिंग मशिन बाजारात विक्रीला आली आहे. मतदान नेमके कसे करायचे, याची माहिती मतदारांना देण्यासाठी डेमो व्होटिंग मशिनचा वापर होणार आहे.

अगदी खऱ्या मतदान यंत्राप्रमाणे ही डेमो व्होटिंग मशिन बनविण्यात आली आहे. बटण दाबल्यावर मतदान केल्यानंतर जसा आवाज येतो, त्याप्रकारचा आवाज डेमो मशिनमधून येतो. पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून ही मशिन बनवून घेतल्याचे येथील विक्रेते गणेश पिसे यांनी सांगितले. थर्माकोल साचा बनवून त्यावर पुठ्ठा लावण्यात आला आहे. डेमो व्होटिंग मशिनवर उमेदवाराचे नाव आणि चिन्हासमोर बटण देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अशिक्षित मतदारांना डेमो मशिन दाखवून मतदान नेमके कसे करायचे, हे दाखविण्यात येऊ शकते.

Web Title: demo voting machine by sell