सांगलीत बॅंक कर्मचाऱ्यांचा संप..निदर्शने

bank.jpg
bank.jpg

सांगली-वेतनवाढीच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स या शिखर संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपाला आज सांगलीत प्रतिसाद मिळाला. बॅंकिंग सेवा दिवसभर ठप्प होती. संघटनेने पटेल चौकात बॅंक ऑफ इंडियासमोर जोरदार निदर्शने केली. शनिवारी (ता.1) देखील संप सुरू राहणार आहे. 


बॅंक कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणी एक नोव्हेंबर 2017 पासून अद्याप लागू केली नाही. 27 महिन्यानंतरही त्यावर तोडगा निघाला नाही. 27 जानेवारी रोजी चीफ लेबर कमीशनर यांच्या पुढाकाराने दिल्लीत बैठक झाली. परंतू बॅंकर्सनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे निर्णय झाला नाही. सध्या बॅंकिंग कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. सरकारी योजनांची कामामध्ये भर पडत आहे. दहाव्या द्विपक्ष करारात बॅंक कर्मचाऱ्यांना 15 टक्के पगारवाढ मिळाली होती. गेल्या 27 महिन्यात 39 वेळा वाटाघाटी होऊनही केवळ 12.25 टक्केच पगारवाढ देण्याचे बॅंकांनी सूचवले आहे. त्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना असून युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स या शिखर संस्थेने दोन दिवसीय संप पुकारला आहे. 


सांगलीतही आज संपमुळे बॅंकांचे कामकाज ठप्प होते. राष्ट्रीयकृत बॅंका, जुन्या खासगी बॅंका, विदेशी बॅंका, ग्रामीण बॅंकातील कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाले आहेत. आज सकाळी पटेल चौकात बॅंक ऑफ इंडियासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकार आणि आरबीआय, आयबीए च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वेतनवाढीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 


बॅंक ऑफ इंडियाचे लक्ष्मीकांत कट्टी, अनंत बिळगी, संजय देशपांडे, सौ. राजश्री कुलकर्णी, एसबीआय चे प्रफुल्ल पाटील, संजय समुद्रे, परशुराम भोरे, सौ. सरिता तावडे, राजश्री वळुकंडे, अजय गावडे, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे जयंत आपटे, महाबॅंकचे संजय नरदे, उमेश खोत, राजेंद्र शिरगुप्पे, बॅंक ऑफ बडोदाचे मोहन जोशी, पी. श्रीनिवासन, किमया उकी, आरबीएल बॅंकेचे अरविंद चौगुले, श्री. कोरूचे आदींसह शेकडो कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com