शहरात डेंगीसदृश आजाराचे 52 रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

सोलापूर - शहरातील 22 रुग्णालयांमध्ये 52 रुग्ण डेंगीसदृश आजारावर उपचार घेत आहेत. प्रादुर्भाव वाढल्याने प्रबोधन आणि उपाययोजनांवर भर देण्यात आला असल्याचे महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी आज सांगितले.

आयुक्तांनी सोमवारी सकाळी शहरातील विविध प्रभागांना भेटी देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला. त्याची माहिती पालक सचिव मिलिंद म्हैसकर यांनाही दिली. शासनाकडून आरोग्याधिकारी तातडीने नियुक्त करावा, अशी मागणी आयुक्तांनी श्री. म्हैसकर यांच्याकडे केली.

श्री. काळम-पाटील म्हणाले, ""शहरातील प्रमुख रुग्णालयांमधील रुग्णांची माहिती सायंकाळपर्यंत मिळाली नाही. तपासणीत 144 रुग्ण तापसदृश आढळले. चार ठिकाणी रुग्णांना प्लेटलेट्‌स दिले जात आहेत. रुग्णांच्या रक्‍ताचे नमुने घेताना महापालिकेसाठी एक नमुना घेण्याची सूचना सर्व रुग्णालयांना केली आहे. हे नमुने पुणे येथील एनआयव्ही संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तपासणी त्वरित व्हावी म्हणून एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी मनुष्यबळ वाढवून घेतले आहे. फवारणी व धुराळणीसाठी एकूण 172 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी 15 वरिष्ठ अधिकारी तर सहा कर्मचाऱ्यांच्या दोन पथकांची नियुक्‍ती केली आहे. शहरात औषधांची फवारणी सुरू आहे. महापालिका शिक्षण विभागामार्फत जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सध्या महिनाभर पुरेल इतका औषधसाठा आहे. पाच लाखांची तरतूद करून औषधसाठा आणण्यासाठी पुणे येथे पथक पाठविले आहे. डेंगीविषयी जनजागृती होण्यासाठी झोननिहाय ऑटोरिक्षांची सोय केली आहे.‘‘ 

डेंगीसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महापालिकेच्या आयडी हॉस्पिटलमध्ये 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. 2323700 या दूरध्वनी क्रमांकावर डेंगीसंदर्भातील तक्रारी नोंदविता येतील.

Web Title: Dengue-like illness in 52 patients