मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

dead_body.jpg
dead_body.jpg

मंगळवेढा : तालुक्यातील लक्ष्मी दहीवडी येथील बारा दिवसांपासून गायब झालेल्या बापू म्हेत्रे या वयोवृध्दाचा मृतदेह गावातच सडलेल्या अवस्थेत सापडला. त्याचे शवविच्छेदन कुणी करायचे यावरून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केल्याने नातेवाईकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकाराबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांच्या कानावर घालण्यात आला. 

येथील बापु कोंडीबा म्हेञे (बनसोडे) हा इसम घरातुन निघुन गेला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर टाकली. शिवाय गुन्हाही दाखल करण्यात आला. परंतु आज सकाळी लक्ष्मी दहिवडी येथील मुसलमान गल्लीतील रहिवाशांना दुर्गंधी परसरली होती. कशाचा वास येतो हे पाहण्यासाठी पडक्या घरात पाहिले असता एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह चिन्ह-विच्छिन्न अवस्थेत दिसला. या मृतदेहाच्या जवळ जाताना अतिशय दुर्गंधी येत होती. काही जण नाकाला रुमाल बांधून त्या मृतदेहापर्यंत पोहचले. 
सदर मृत इसम हा बापू म्हेञे यांचे असल्याचे चर्चा संपूर्ण गावात पसरली. यावेळी गावातील नागरिकांनी पोलीस पाटील यांना संपर्क करून सदर घटनेची माहिती देण्यात आली. आंधळगाव येथील वैद्यकीय अधिकऱ्यास शवविच्छेदन करण्याची वैद्यकीय पात्रता नसल्यामुळे ते करू शकत नाहीत तर मंगळवेढ्याच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदरचे गाव कार्यक्षेत्रात येत नसल्याचे कारण देत टाळाटाळ केली.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याच्या बाबतीत टाळाटाळ केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राने अवहेलना करण्याचा प्रयत्न केला.या ठिकाणी नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यास मरवडेचा अतिरिक्त पदभार दिला असून तालुक्यातील रिक्त पदे जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com