पतसंस्थेत अडकल्या ६४२ कोटींच्या ठेवी

तात्या लांडगे  
सोमवार, 2 जुलै 2018

सोलापूर - राज्यातील २७३ पतसंस्थांकडे ६० लाख ३७ हजार ठेवीदारांच्या ६४२ कोटी रुपयांच्या ठेवी मागील आठ-दहा वर्षांपासून अडकल्या आहेत. त्या ठेवीच्या वसुलीसाठी सहकार विभागाने प्रत्येक जिल्हा उपनिबंधकांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, बहुतांशी जिल्ह्याचे आराखडे अद्यापही तयार झालेले नाहीत, अशी माहिती सहकार आयुक्‍त कार्यालयाकडून देण्यात आली.

ग्रामीण भागातील नागरिकांचा विश्‍वास संपादन करून ठिकठिकाणी पतसंस्था स्थापन झाल्या. काही बॅंकांच्या शाखा असूनही त्या ठिकाणी खिरापत वाटल्यासारखी पतसंस्थांना मान्यता देण्यात आली. ठेवीदारांच्या ठेवीतून कर्ज घेतलेले अनेक कर्जदार मोठे भांडवलदार झाले. मात्र, संचालक मंडळासह पतसंस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्जवसुलीचे ठोस नियोजनच केले नाही. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांच्या घामाचा पैसा अनेक पतसंस्थांमध्ये मागील काही वर्षांपासून अडकला. काही दिवस ठेवीदार सातत्याने चौकशी करतात, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे हेलपाटे मारतात. मात्र, काही पतसंस्था बड्या राजकीय पुढाऱ्यांच्या अथवा त्यांच्या नातेवाइकांच्या असल्याने कारवाई संथगतीने सुरू असल्याची चर्चा आहे.

Web Title: Deposits of Rs 642 crores lying in the credit society