Maratha Reservation Protest:'मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबईत २९ ऑगस्टच्या मोर्चासाठी सांगलीत जिल्हाभर बैठका; मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याचा निर्धार
Sangli District Support For Maratha Reservation: ‘सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षांतील राजकारण बाजूला ठेवून आजी-माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच सदस्य, सर्व संस्था, पक्षांचे पदाधिकारी, सर्व तरुण मंडळांचे सदस्य व मराठा बंधू-भगिनी सहभागी होणार आहेत. आपल्या समाजातील गरजवंत मराठ्यांना न्याय देण्याची हीच ती वेळ आहे.
Maratha Reservation Stir: Sangli District Gears Up for August 29 Protest MarchSakal
सांगली : मराठा आरक्षणासंदर्भातील आझाद मैदानावर २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चासाठी सांगली जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे. आरक्षणाची लढाई विजयाच्या काठावर आली आहे. वारंवार वेळ देऊनही सरकारने चालढकल केली.