शनिशिंगणापुरात "लटकू बंद'चा निर्णय फत्ते 

विनायक दरंदले
बुधवार, 15 जानेवारी 2020

गडाखांच्या अध्यक्षतेखाली शनिशिंगणापुरात 30 डिसेंबर 2019 रोजी "लटकू बंद'च्या निर्णयासाठी बैठक झाली. पोलिसांनी वाहने अडविताना किंवा पूजा साहित्याची सक्ती करताना लटकूस अटक केली, तर तो काम करीत असलेल्या दुकानमालक व वाहनतळ मालकावरही कारवाई करण्याचे ठरले.

सोनई : यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून शनैश्वर देवस्थान ट्रस्टने एक जानेवारीपासून लटकूंवर विशेष लक्ष केंद्रित केल्याने भाविकांची अडवणूक व सक्तीची साडेसाती हटली आहे. सुखकर दर्शनाबद्दल शनिभक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

अवश्‍य वाचा- कर्जमाफी प्रक्रियेत "ही' बॅंक आघाडीवर 

गडाखांच्या अध्यक्षतेखाली शनिशिंगणापुरात 30 डिसेंबर 2019 रोजी "लटकू बंद'च्या निर्णयासाठी बैठक झाली. पोलिसांनी वाहने अडविताना किंवा पूजा साहित्याची सक्ती करताना लटकूस अटक केली, तर तो काम करीत असलेल्या दुकानमालक व वाहनतळ मालकावरही कारवाई करण्याचे ठरले. यामुळे सारेच लटकू हद्दपार झाले आहेत. निर्णयानंतर चौदाव्या दिवसापर्यंत फक्त एकाच लटकूवर कारवाई झाली. सध्या पोलिस व देवस्थानच्या सुरक्षा विभागाची गस्त सुरू आहे.

पूजाविक्रेत्यांना ताकीद

यापूर्वी ग्रामपंचायतीचा प्रवासीकर नाका, यशवंतनगर, ब्राह्मणी, गोटुंबे आखाडा, घोडेगाव रस्त्यावरील शिवांजली चौक, शिंगणापूर फाटा व राज्यमार्गावरील फाट्यावर दोनशेहून अधिक लटकू वाहने अडविण्यासाठी थांबत होते. आज या सर्व ठिकाणी भेट दिली असता एकही लटकू दिसला नाही. काही वाहनतळ मालकांनी लटकूंच्या मोटरसायकली ताब्यात घेऊन पूजाविक्रेत्यांना ताकीद दिली आहे. 

हेही वाचा- मैला फिल्टरायझेशन प्रकल्प कार्यान्वित 

भाविकांकडून निर्णयाचे स्वागत

वाहनांचा पाठलाग, अडवणूक, पूजासाहित्याच्या सक्तीमुळे त्रस्त भाविक दर्शन आटोपून आल्या पावली जात होते. आता अनेक भाविक गावातील इतर मंदिर, पानसनाला प्रकल्प, गो-शाळा आदी ठिकाणी थांबताना दिसतात. मागील चार-पाच वर्षांत खराब झालेली गावाची प्रतिमा आता या निर्णयामुळे पुन्हा उजाळून निघत आहे. परराज्यांतील अनेक भाविक लटकू बंद निर्णयाचे स्वागत करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees will be a pleasant visit to Shani shingnapur