‘त्यांना’ विमान दिसतच नाही - धनंजय महाडिक

Dhananjay-mahadik
Dhananjay-mahadik

कोल्हापूर - खासदार झाल्यापासून विमानतळासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता बंगळूर आणि हैदराबाद येथे विमान सेवा सुरू झाली. महिनाभरात चार हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. विमानतळावर नियमितपणे विमाने येतात; पण ‘त्यांना’ दिसत नाहीत. म्हणूनच ते विमान कुठे आहे? असा कांगावा करतात, अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी नाव न घेता त्यांच्या पारंपरिक विरोधकांवर केली.

वर्षभरापूर्वी रस्ते नामकरणाच्या एका जाहीर कार्यक्रमात विमान, विमान म्हणून आम्ही वर्तमानपत्रातून वाचतो; पण कोल्हापुरात आकाशात काही विमान उडताना दिसत नाही, असा टोला खासदार महाडिकांना त्यांच्या पारंपरिक विरोधकांनी लगावला होता. शिवसेनेनेही विमानतळावर कागदी विमान उडवून महाडिक यांच्या आश्‍वानसाची खिल्ली उडवली होती. आज या सर्व टोलेबाजीचा समाचार खासदार महाडिक यांनी घेतला. विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंग आणि ए.टी.सी. टॉवरच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

महाडिक म्हणाले, ‘‘मी लोकसभा निवडणुकीमध्ये विमानतळ सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. विमानतळ पुन्हा सुरू व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच पुन्हा एकदा येथे विमानसेवा सुरू झाली. आज त्या वचनपूर्तीचा आनंद होत आहे. कोल्हापूरमधून हैदराबाद, बंगळूर ही विमानसेवा सुरू झाली. गेल्या महिन्याभरात सुमारे चार हजार प्रवाशांनी याचा लाभ घेतला. कोल्हापूर विमानतळावर नियमितपणे विमाने येत आहेत. असे असूनही ‘त्यांना’ विमान दिसत नाही. त्यामुळे ते विमान कुठे आहे, अशी ओरड करत असतात.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com