गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत खुलासा झाल्याशिवाय शांत बसणार नाही: मुंडे

Dhananjay Munde
Dhananjay Munde

कर्जत : अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही. आम्ही मात्र हा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा अहमदनगर जिल्हयातील कर्जत येथे पोहचली असून, यावेळी झालेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, रोहित पवार, दिलीप वळसे-पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते. कर्जत येथील सभेच्या ठिकाणी धनगर समाजाने पारंपारिक नृत्य सादर केले. हा खऱ्या अर्थाने परिवर्तनाचा उत्सव आहे. परिवर्तनात धनगर समाजाचा मोठा वाटा असेल हा मला विश्वास आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, की गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊस मजुरांचे महामंडळ काढण्याचे सरकारने योजले होते, तेही त्यांनीच रद्द केले. औरंगाबाद येथे मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी जागा देणार होते. कुठे आहे जागा? कुठे आहे स्मारक? नुसत्या हवेत गप्पा. हा मुंडे साहेबांचा अपमान आहे. देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक... हा दावा मी नाही राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयच करत आहे. मोदीजी तुमच्या नोटबंदीनं काय साध्य केलं? देशातील तरूणांना रोजगार देणं तर सोडाच, ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांच्या पोटावरसुद्धा तुम्ही पाय दिला. सरकारने शेतकऱ्यांना तूर लावण्यास सांगूनही तूरीला भाव दिला नाही. मंत्री सुभाष देशमुख यांनी तूर डाळीत केलेला भ्रष्टाचार आम्ही उघड केला. त्याची साधी चौकशीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली नाही. या घोटाळ्यामुळेच शेतकऱ्यांना तूरीसाठी योग्य भाव मिळाला नाही. तीन लाख रुपयांच्या कर्जबाजारीपणामुळे, दुष्काळी परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्येतून नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी नांदेड येथे शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली. पाषाण ह्रदयी सरकारला पाझर फुटत नसेल तर मग हे सरकार हवे कशाला? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com