मंगळवेढ्यात धनगर समाजाचा मोर्चा

हुकूम मुलाणी
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मुख्यमंत्र्यांनी चार वर्षापुर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या खोट्या आश्वासनाबद्दल धनगर समाजातून तिव्र नाराजी व्यक्त करत समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढुन उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीदार आप्पासाहेब समींदर यांना निवेदन दिले.

मंगळवेढा- मुख्यमंत्र्यांनी चार वर्षापुर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या खोट्या आश्वासनाबद्दल धनगर समाजातून तिव्र नाराजी व्यक्त करत समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढुन उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीदार आप्पासाहेब समींदर यांना निवेदन दिले.

आ. भारत भालके, तानाजी खरात, सभापती प्रदिप खांडेकर, नगराध्यक्षा अरुणा माळी सुरेश कोळेकर, प्रकाश वणगे, पांडुरंग चौगुले, महावीर ठेंगील, रामचंद्र मळगे, ईश्वर गडदे, आप्पा चोपडे, ईराप्पा पुजारी, नामदेव जानकर, दादा गरंडे, अॅड. रविकिरण कोळेकर, बापु मेटकरी, बापु पांढरे, धनाजी गडदे, गुरूलिंग दोलतोडे धनाजी बिचुकले आदीसह तालुक्यातील धनगर समाजाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते ऊपस्थित होते. यावेळी 
सत्ता द्या सहा महिन्यात धनगर समाजाला आरक्षण देतो असून असे चार वर्षे झाली तरीही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही.

महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाजास अनुसुचीत जमातीचे दाखले देऊन सवलतीची अंमलबजावनी त्वरीत करावी. सोलापूर विद्यापीठाला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव त्वरीत देण्यात यावे. महाराष्ट्र राज्यात धनगर आरक्षणासाठी झालेल्या अांदोलना संदर्भात दाखल करण्यात आलेले आजपर्यंतचे सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. समांतर आरक्षणाचे शासनाने काढलेले 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकात योग्य त्या सुधारणा कराव्यात व समाजावर झालेला अन्याय दुर करावा, या मागण्या मांडल्या. सोशल मिडीयात 13 ऑगस्टला मंगळवेढा बंद राहील अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल झाले, परंतु, गोर गरीब शेतकरी, व्यापारी व इतर समाजाच्या भावना लक्षात घेता हे या समाजाने शांततामय मार्गाने मंगळवेढा बंद न करता मोर्चा यशस्वी केला.

Web Title: Dhangar community movement in Mangalvedha